Wednesday, December 11, 2024
Homeमहाराष्ट्रपोलीस अ‍ॅक्शनमोडमध्ये, आंदोलकांवर लाठीमार, आयजी पोहचले, दिवसभरात काय काय घडले?

पोलीस अ‍ॅक्शनमोडमध्ये, आंदोलकांवर लाठीमार, आयजी पोहचले, दिवसभरात काय काय घडले?

राज्यात परभणीत मंगळवारी घडलेल्या घटनेचे पडसाद मोठ्या प्रमाणावर उमटले. परभणीमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राज्यघटनेची प्रत ठेवली आहे. मंगळवारी संध्याकाळी माथेफिरूने संविधानाच्या प्रतीची विटंबना केली. जमावाने त्याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. परंतु या घटनेमुळे पराभणीत बुधवारी बंद पुकारण्यात आला. या बंदला हिंसक वळण लागले. परभणीतील तणावपूर्ण परिस्थितीमुळे आयजी शाहजी उमप शहरात दाखल झाले आहे. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे म्हटले आहे.

 

आयजी शाहजी उमप म्हणतात…

आयजी शाहजी उमप यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना सांगितले की, परभणीत मंगळवारी घडलेल्या घटनेनंतर आज बंद पुकारला होता. आज बंद आणि जिल्हाधिकारींना निवेदन देणे असा कार्यक्रम आंदोलकांचा होता. परंतु निवेदन देण्यासाठी येताना काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. काही ठिकाणी टायर जाळले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात महिला आणि पुरुषांनी तोडफोड केली. परंतु आता परिस्थिती नियंत्रणात आहे.

 

जिल्हाधिकारींचे दालन आंदोलकांनी फोडले

जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलकांनी तोडफोड केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाचे सर्व कर्मचारी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात येऊन बसले. जिल्हाधिकारींचे दलन ही आंदोलकांकडून फोडण्यात आले. यामुळे कर्मचारी घाबरले. ते जिल्हाधिकारी यांच्या दालनात ठाण मांडून बसले.

 

दरम्यान, पोलिसांकडून आंदोलकांवर पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठी चार्ज करावा लागला. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यामुळे सध्या परभणीत तणावपूर्ण शांतता आहे. परभणीत तणावाची स्थिती कायम आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी आदेश लागू केला असून इंटरनेट सेवाही बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 

दिवसभरात काय, काय घडले?

पराभणीत आंदोलकांनी दुकानांना लावली आग

आंदोलकांनी रस्त्यावर जाळले टायर

जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड

घाबरलेले कर्मचारी जिल्हाधिकारींच्या दालनात

सीसीटीव्ही कॅमेरे फोडले

पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडला

पोलिसांकडून आंदोलकांवर सौम्य लाठीमार

पराभणीत इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश

जिल्हाधिकारींना काढले जमावबंदीचे आदेश

आयजी शाहजी उमप परभणीत दाखल

गिरीश महाजन म्हणतात…

दरम्यान, भाजप नेते गिरीश महाजन म्हणाले की, परभणीमध्ये केलेले कृत्य एका माथेफिरुने केले आहे. तो ठार वेडा आहे. त्याची परभणीकरांना कल्पना आहे. त्याला अटक केली आहे. संविधान सगळ्यांसाठी सर्वोच्च आहे. कायदा हाती घेऊन सामाजिक सलोखा बिघडणारे कृत्य करु नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन महाजन यांनी केले.

 

बसेस थांबवल्या

परभणीत जाळपोळीच्या घटना घडल्यानंतर इतर जिल्ह्यातून जालना मार्गे परभणी आणि जिंतूर जाणाऱ्या जवळपास 15 एसटी बस जालन्यातील मंठा येथील बसस्थानकावर थांबवल्या आहेत. जालन्यातील परतुर आणि अंबड आगारातील परभणीकडे जाणाऱ्या 7 बस फेऱ्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी एसटी महामंडळाकडून खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -