गाबा कसोटी सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे भारतीय क्रीडाप्रेमींच्या जीवात जीव आला आहे. कारण पावसाने हजेरी लावली नसती तर हा सामना कधीच ऑस्ट्रेलियाने जिंकला असता. पण पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना पाचव्या दिवसापर्यंत खेचला गेला आहे. खरं तर हा सामना ड्रॉच्या दिशेने झुकला आहे. त्यामुळे पाचव्या दिवशी काय होते याची उत्सुकता लागून आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 9 गडी गमवून 252 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडे 193 धावांची आहे. असं असताना गाबा कसोटीतील रोहित शर्माची एक कृती चर्चेचा विषय ठरली आहे. खरं कर्णधार रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमध्ये वारंवार फेल होत आहे. त्याच्या बॅटिंगची जादू संपली असंच क्रीडाप्रेमींना वाटत आहे. त्यात कर्णधारपदाखाली वारंवार पराभवाचं तोंड पाहावं लागत असल्याने क्रीडाप्रेमींच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावातही रोहित शर्मा फेल गेला. खरं तर चौथ्या दिवशी त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण तसं काही झालं नाही. फक्त 10 धावा करून पॅट कमिन्स चेंडूवर बाद होत तंबूत परतला. तंबूत परताना त्याची एक कृती चर्चेचा विषय ठरली आहे. जाताना रोहित शर्माने ग्लव्ह्ज डगआऊटकडे सोडून गेला. त्यानंतर ग्लव्ह्ज तिथेच पडून राहिले.
सोशल मीडियावर रोहित शर्माच्या ग्लव्ह्जचा फोटो व्हायरल होत आहे. यावरून काही जणांनी वेगवेगळे अंदाज बांधले आहेत. युजर्सच्या मते रोहित शर्मा या मालिकेनंतर निवृत्ती घेण्याची शक्यता आहे. तर काही युजर्संनी रोहित शर्मा कर्णधारपद सोडेल असं सांगितलं आहे. त्यामुळे ग्लव्ह्ज तिथेच सोडून देण्याचा नेमका अर्थ काय हे सांगणं आतातरी कठीण आहे. मात्र त्याच्या ग्लव्ह्जची चर्चा मात्र रंगली आहे
पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित शर्मा खेळला नाही. कौटुंबिक कारणामुळे त्याने पहिल्या सामन्यात भाग घेतला नव्हता. पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराहने नेतृत्व केलं. हा सामना भारताने जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात रोहित शर्माने नेतृत्व केलं आणि भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात 3, तर दुसऱ्या डावात रोहित शर्माने 6 धावा केल्या. आता तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात 10 धावा करून बाद झाला.