Wednesday, December 18, 2024
Homeक्रीडा‘प्रत्येक गोष्टींसाठी धन्यवाद..’, अश्विनच्या निवृत्तीनंतर विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना

‘प्रत्येक गोष्टींसाठी धन्यवाद..’, अश्विनच्या निवृत्तीनंतर विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना

टीम इंडियाचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गाब्बा कसोटी सामना संपताच त्याने आपली निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला. मालिकेदरम्यान निवृत्ती घेतल्याने अनेकांना नेमकं कारण काय तेच कळलं नाही. गाब्बा कसोटीत टीम इंडियात आर अश्विनला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं नव्हतं. दरम्यान, त्याने निवृत्ती जाहीर केली असून 19 डिसेंबरला भारतात परतणार आहे. दरम्यान, अश्विनने ड्रेसिंग रुममध्ये कोहलीसोबत निवृत्तीबाबत चर्चा केली होती.निवृत्तीच्या घोषणेपूर्वी विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन ड्रेसिंग रूममध्ये एकमेकांना मिठी मारतानाचे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या चर्चेनंतर अश्विनने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासोबत पत्रकार परिषदेत हजेरी लावली आणि निवृत्तीची घोषणा केली. आर अश्विनने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर विराट कोहलीही भावुक झाला. त्याने त्याच्यासोबत व्यतित केलेल्या प्रत्येक क्षणांबाबत दिलखुलासपणे सांगितलं. तसेच आपल्या भावना व्यक्त केल्या.

 

“मी 14 वर्षे तुझ्यासोबत खेळलो आणि आज तू निवृत्त होत असल्याचे सांगितले तेव्हा मी थोडा भावूक झालो.आपण एकत्र खेळलेल्या सर्व आठवणी माझ्यासमोर आल्या. तुझ्यासोबतच्या प्रवासातील प्रत्येक क्षण मी एन्जॉय केला आहे. भारतीय क्रिकेटमध्ये तुमचे कौशल्य आणि सामना जिंकण्याचे योगदान अतुलनीय आहे आणि तुम्ही भारतीय क्रिकेटचे एक दिग्गज म्हणून नेहमी स्मरणात राहाल. तुमच्या कुटुंबासाठी आणि तुमच्या जीवनात जे काही येईल त्यासाठी शुभेच्छा. तुम्हाला आणि तुमच्या जवळच्या लोकांसाठी खूप आदर आणि खूप प्रेम. प्रत्येक गोष्टीबद्दल धन्यवाद मित्रा.”, अशी पोस्ट विराट कोहलीने लिहिली आहे.

 

आर अश्विन 106 कसोटी सामने खेळला आहे. यात त्याने 537 विकेट घेतल्या आहेत. 37 वेळा पाच विकेट घेण्याचा मान मिळवला आहे. विशेष म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये 537 विकेट्स घेणाऱ्या अश्विनने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली सर्वोत्तम कामगिरी केली. कोहलीच्या नेतृत्वाखाली अश्विनने 55 कसोटी सामने खेळले आणि 293 बळी घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -