Wednesday, December 18, 2024
Homeतंत्रज्ञान2024 मध्ये तंत्रज्ञानात झाली मोठी प्रगत; लॉन्च झाले हे गॅजेट्स..

2024 मध्ये तंत्रज्ञानात झाली मोठी प्रगत; लॉन्च झाले हे गॅजेट्स..

2024 या वर्षांमध्ये अनेक नवनवीन गोष्टी घडलेल्या आहेत. टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात देखील अनेक मोठ्या प्रगती झालेली आहे. टेक्नॉलॉजीमध्ये अनेक नवनवीन गॅजेट्स 2024 मध्ये लॉन्च झालेले आहेत. ते गॅजेट्स त्यांच्या वैशिष्ट्यमुळे आणि लुकमुळे 2024 मध्ये चर्चेत राहिलेले आहेत. तसेच मानवासाठी देखील खूप चांगला फायदा झालेला आहे. आता आपण 2024 मध्ये लॉन्च झालेल्या अशाच काही हटके गॅजेटबद्दल जाणून घेणार आहोत.

 

Gadgets launches in 2024

2024 मध्ये टीव्हीच्या विश्वामध्ये खूप मोठ्या बदल झालेला आहे. आपण अगदी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही पासून ते एलईडी पर्यंतचा टीव्ही पाहिलेला आहे. परंतु 2024 मध्ये एलजी कंपनीने चक्क बाजारामध्ये पारदर्शक टीव्ही आणलेला आहे. या टीव्हीमध्ये एक आपारदर्शक लेयर आहे. रिमोटचा वापर करून ती लेवल हटवली जाते. तेव्हा ती टीव्ही पूर्णपणे पारदर्शक होते. या टीव्हीमध्ये एलजीचा अल्फा 11 एआय प्रोसेसर देखील आहे. यामध्ये पिक्चर क्वालिटी देखील चांगली दिसते. तसेच ब्लॅक आणि ट्रान्सपरंटमध्ये तुम्ही सहज यामध्ये स्वीच करू शकता.

 

ट्रिपल फोल्डिंग स्मार्टफो

2024 मध्ये अनेक नवनवीन मोबाईल फोन लॉन्च झालेले आहेत. प्रत्येक मोबाईल हा त्याच्या हटके लूकमुळे आणि वैशिष्ट्यामुळे चर्चेत आलेला आहे. परंतु या वर्षी चिनी कंपनीने एक वेगळाच फोन लॉन्च केलेला आहे. यामध्ये तीन वेळा फोल्ड होणारा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आलेला आहे. हा स्मार्टफोन उघडल्यानंतर एका टेबलेट सारखा मोठा होतो. यामध्ये जवळपास 10.2 इंचाची स्क्रीन आहे. तसेच ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप देखील आहे. त्याचप्रमाणे या फोनमध्ये 16 जीबी रॅम आणि वन टीबीपर्यंत स्टोरेज देखील आहे. यामध्ये 6.4 in चा सेकंडरी डिस्प्ले देण्यात आलेला आहे.

 

 

स्लिम फोल्डेबल स्मार्टफोन

2024 मध्ये जगातील सगळ्यात पातळ आणि हलका फुलका लेबल स्मार्टफोन तयार करण्यात आलेला आहे. या फोनमध्ये अनेक वैशिष्ट्य आहेत. स्पेसिफिकेशन देखील देण्यात आलेला आहे. सॅमसंगचा हा लोकप्रिय फोल्डेबल फोन गॅलेक्सी झेड फोर 6 पेक्षा देखील पातळ आहे गॅलेक्सी झेड फोर 6 ची जाडी 12.1 मिनी एवढी आहे. परंतु या मॅजिक फोनची जाडी फक्त 9.2 एवढी आहे. तसेच या नव्या पोर्टेबल फोनचे वजन देखील 226 ग्रॅम एवढे आहे.

 

Orion स्मार्ट वॉच

यावर्षी मेटा सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी आतापर्यंतचा सगळ्यात स्मार्ट चष्मा लॉन्च केलेला आहे. यामध्ये जगातील सर्वात प्रगत स्मार्ट ग्लास वापरण्यात आल्या असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. याला कोणत्याही प्रकारच्या तारा जोडलेल्या नाहीत. तसेच त्याचे वजन देखील केवळ 200 ग्रॅम पेक्षा ही कमी आहे. कंपनीने पूर्ण होलोग्राफिकेट रियालिटी चष्मा तयार केलेला आहे. हा चष्मा आवाजाद्वारे नियंत्रित केला जातो. तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे देखील इंटेग्रेशन देण्यात आलेले आहे.

 

Casio रिंग साइज वॉच

2024 मध्ये लोकप्रिय डिजिटल वॉच निर्मित कंपनी कॅसिओने पहिले रिंग आकाराचे घड्याळ लाँच केलेले आहे. या रिंगमध्ये अर्ध केसिओ डिझाईन करण्यात आलेले आहे. आणि एक छोटी स्क्रीन देखील दिसते. यामध्ये तुम्हाला संपूर्ण वेळ दिसते. एक इंच पेक्षा कमी आकाराची ही रिंग आहे. या रिंग मध्ये 7 सेगमेंटची एलईडी स्क्रीन दिसते. तसेच 3 फिजिकल बटन देखील आहेत. यामध्ये स्टॉपवॉचचे वैशिष्ट्य देखील आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -