Wednesday, December 18, 2024
Homeब्रेकिंगधावत्या स्कूल बसमध्ये 35 चिमुकले मुले अन् अचानक लागली आग, आगीच्या घटनेचा...

धावत्या स्कूल बसमध्ये 35 चिमुकले मुले अन् अचानक लागली आग, आगीच्या घटनेचा थरारक व्हिडिओ

गेल्या काही दिवसांपासून बस अपघाताच्या विविध घटना समोर येत आहे. मंगळवारी मुंबईतील अंधेरीत शाळेच्या मुलांची सहल जात होती. त्या बसचा चालक दारुच्या नशेत होता. वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे ती दुर्घटना टळली होती. आता बुधवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात धावत्या स्कूलबसमधील आगीचा थरार समोर आला आहे. या बसमध्ये 35 मुले होती. दोन शिक्षकांच्या प्रसंगावधानामुळे या चिमुकल्यांचे जीव वाचला. ही घटना सिल्लोड तालुक्यातील आमठाणा गावाजवळ घडली.

 

बसमध्ये होते 35 विद्यार्थी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथील घटना समोर आली आहे. या गावात विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या धावत्या स्कूल बसने अचानक पेट घेतली. या बसमध्ये तब्बल 35 विद्यार्थी होते. या बसने पेट घेतल्यामुळे धावपळ उडाली. मात्र बसमधील दोन शिक्षकांच्या प्रसंगावधानामुळे 35 विद्यार्थ्यांचे प्राण वाचले. आमठाणा गावाजवळ बुधवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

 

स्कूल बसला लागलेली आग विझवण्यात आली.

 

नेमके काय घडले?

घाटनांद्रा येथून शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस निघाली होती. ही बस आमठाणा येथे असताना त्यातून धूर निघू लागला. बस चालकाला ही बाब लक्षात आली. त्याने लागलीच वाहन थांबवले. यावेळी बसमध्ये दोन शिक्षक बसले होते. त्यांनी प्रसंगावधान राखत सर्व मुलांना तातडीने खाली उतरवले. सर्व मुले बसमधून खाली उतरवल्यावर काही क्षणात बसला आग लागली

 

शेतातील विहिरींना जोडले पाईप

दरम्यान, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बसला आग लागल्याची वाऱ्यासारखी पसरली. या भागातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतातील विहिरीचे पाणी पाईपलाईनला जोडले. त्यानंतर बसवर पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. बसमध्ये चौथी ते सातवी वर्गात शिकणारे विद्यार्थी होते. जवळपास परिसरातील तब्बल ५०० मुले खाजगी वाहनाने शाळेत ये-जा करतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -