Wednesday, December 18, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईच्या समुद्रात एलिफंटला जाणाऱ्या दोन बोटीत धडक, बोट उलटली

मुंबईच्या समुद्रात एलिफंटला जाणाऱ्या दोन बोटीत धडक, बोट उलटली

मुंबईत गेट ऑफ इंडियाजवळच्या समुद्रात धक्कादायक घटना घडली आहे. गेट वे ऑफ इंडियाजवळून दोन बोटी एलिफंटाच्या दिशाने निघाल्या होत्या. या दोन बोटींमध्ये धडक झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. त्यानंतर ही बोट उलटली. सुदैवाने या घटनेत कोणताही जीवित हानी झाली नाही. या दोन्ही प्रवासी बोटी होत्या. त्यामधून अनेक प्रवासी प्रवास करत होते. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे

 

दोन बोटींमध्ये टक्कर

मुंबईत गेट ऑफ इंडिया पाहण्यासाठी रोज हजारो पर्यटक येत असतात. त्यातील काही पर्यटक गेट ऑफ इंडिया पहिल्यानंतर एलिफंटा येथील गुफा पाहण्यासाठी जात असतात. एलिफंटाला जाण्यासाठी पर्यटकांना बोटीने प्रवास करावा लागतो. बुधवारी दुपारी पर्यटकांनी भरलेल्या दोन बोटी एलिफंटाच्या दिशेने निघाल्या होत्या. या दोन बोटींमध्ये टक्कर झाली. त्यानंतर बोट उलटली. प्रवाशांना लाईफ जॅकेट देण्यात आले होते. त्यामुळे सुदैवाने कोणताही जीवीत हानी झाली नाही

 

उलटलेल्या नीलकमल बोटीत ३० ते ३५ प्रवासी

उलटलेल्या बोटीचे नाव नीलकमल असे आहे. या बोटीमध्ये ३० ते ३५ प्रवासी होते. उरण, कारंजा परिसरात बोट उलटल्याची माहिती पोलिसांनी दिली. नेव्ही, जेएनपीटी, कोस्टगार्ड, पोलिसांच्या आणि स्थानिक माछीमारांच्या बोटीच्या साहाय्याने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -