Wednesday, September 17, 2025
Homeक्रीडाआर अश्विनप्रमाणे या दिग्गज भारतीय खेळाडूंनी आपला निवृत्तीचा सामना खेळला नाही, जाणून...

आर अश्विनप्रमाणे या दिग्गज भारतीय खेळाडूंनी आपला निवृत्तीचा सामना खेळला नाही, जाणून घ्या

आर अश्विनने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला निरोप दिला. अश्विनला दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. मात्र निवृत्तीच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याला खेळायला मिळाले नाही. अश्विनप्रमाणे पाच भारतीय खेळाडूंना आपला निरोपाचा सामना खेळता आला नाही.

 

एमएस धोनीने 2014 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. माजी कर्णधार एमएस धोनीनेही 2014 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तिसऱ्या सामन्यानंतर निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर सहा वर्षांनंतर 15 ऑगस्टला धोनीने वनेड आणि टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. धोनीलाही अश्विनसारखा फेअरवेल सामना खेळता आला नाही.

 

युवराज सिंगलाही निरोपाचा सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. 2017 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. त्यानंतर त्याने 2019 मध्ये निवृत्ती जाहीर केली. आपला शेवटचा एकदिवसीय सामना खेळण्यापूर्वी युवराज सिंगने जवळपास दोन वर्षे भारतीय संघात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला पण त्याला यश आले नाही.

 

भारतीय संघाचा यशस्वी प्रशिक्षक आणि माजी कर्णधार राहुल द्रविड यालाही निरोपाचा सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. 2012 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर राहुल द्रविडने अचानक पत्रकार परिषद घेऊन निवृत्ती जाहीर केली.

 

भारताचा दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणलाही आपला निरोप सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. 18 ऑगस्ट 2018 रोजी हैदराबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत लक्ष्मणने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला.

 

भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागलाही निरोपाचा सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याला आपला निरोपाचा सामना खेळायची इच्छा होती. मात्र बोर्डाने त्याला निरोपाचा सामना खेळण्याची संधी दिली नाही. अखेर सेहवागने 20 ऑक्टोबर 2015 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -