Thursday, December 19, 2024
Homeमहाराष्ट्रनेमका अपघात कसा झाला? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले…

नेमका अपघात कसा झाला? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले…

मुंबईतील समुद्रात बुधवारी मोठी दुर्घटना घडली. गेट ऑफ इंडियाजवळ घडलेल्या या दुर्घटनेमुळे १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन जण नौदलाचे कर्मचारी तर दहा जण पर्यटक आहेत. नौदलाच्या बोटीने नीलकमल या बोटीला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. दरम्यान या अपघातासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. हा अपघात कसा झाला ते त्यांनी सांगितले आहे.

 

कसा झाला अपघात

नौदलाच्या बोटीला नवीन इंजीन लावले होते. त्या इंजिनाची चाचणी घेतली जात होते. त्या चाचणीच्या वेळी इंजीनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे बोटीवरील ताबा गेला. त्यानंतर भरधाव असणारी ही बोट नीलकमल बोटीवर आदळली आणि अपघात झाला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

अपघातामध्ये १३ जणांचा मृत्यू

नीलकमल आणि नौदलाची स्पीड बोट यांच्या झालेल्या या अपघातात १३ लोकांचा मृत्यू झाला आहे. या १३ लोकांमध्ये १० नागरिक आहेत. तीन नौदलाचे कर्मचारी आहेत. दोन व्यक्ती गंभीर जखमी आहे. त्यांना नौदलाच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. ११ नौदलच्या स्पीड बोट आणि ४ हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सर्वांना वाचवण्यात आले आहे. आज संध्याकाळी ७.३० पर्यंत ही माहिती मिळाली आहे. अधिक माहिती गुरुवारी सकाळ मिळेल. कोणी मिसिंग असेल तर उद्या सकाळपर्यंत कळले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

मृत्यू झालेल्यांना पाच लाख

दुर्घटनेत ज्या लोकांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपये देण्यात येणार आहे. या घटनेची चौकशी मुंबई पोलीस आणि नौदल करणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

 

नौदलाकडून देण्यात आली माहिती

दरम्यान, या घटनेबाबत नौदलाने रात्री माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की, १८ डिसेंबर २०२४ रोजी सुमारे दुपारी चार वाजता नौदलाच्या बोटीची इंजिन चाचणी करण्यात येत होती. त्यावेळी नौदलाच्या बोटीचे नियंत्रण सुटले आणि नीलकमल या प्रवासी बोटीला ती बोट धडकली. तटरक्षक दल आणि पोलिसांच्या समन्वयाने नौदलाने तातडीने शोध आणि बचाव कार्य सुरू केले. चार नौदल हेलिकॉप्टर, ११ नौदल क्राफ्ट, एक तटरक्षक नौका आणि तीन सागरी पोलिस नौका बचावकार्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -