शेअर बाजारात आज हाहाकार माजला. संरक्षण उत्पादन निर्मितीमधील कंपनी सी2सी ॲडव्हान्स सिस्टिमच्या शेअरने बाजारात धुमाकूळ घातला आहे. 3 डिसेंबर रोजी हा शेअर बाजारात सूचीबद्ध झाला आहे. कंपनीचा शेअर बुधवारी, 18 रोजी 10 टक्क्यांनी उसळला. हा शेअर 845.95 रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहचला. या शेअरने NSE SME श्रेणीत 3 डिसेंबर रोजी 90 टक्क्यांसह 429.40 रुपयांवर एंट्री घेतली होती. या कंपनीच्या आयपीओ किंमतींपेक्षा सध्याची शेअरची किंमत 275 टक्के म्हणजे जवळपास तिप्पट आहे. गेल्या एका आठवड्यात कंपनीच्या शेअरमध्ये 40.06 टक्क्यांची तेजी दिसून आली.
22-26 नोव्हेंबर दरम्यान आला आयपीओ
सी2सी ॲडव्हान्स सिस्टिमचा 99.07 कोटी रुपयांचा आयपीओ 22-26 नोव्हेंबर दरम्यान उघडला. यामध्ये किरकोळ गुंतवणूकदारांनी सर्वाधिक पैसा ओतला होता. हा आयपीओ 125.35 पट सब्सक्राईब झाला. कंपनीच्या 99.07 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी 214-226 रुपयांची प्राईस बँड आणि 600 शेअरचा लॉट निश्चित होता. या आयपीओकडून केवळ नवीन शेअर जारी करण्यात आले
1407 कोटींची कंपनी
स्मॉल कॅप कंपनी केफिन टेक्नोलॉजीजचे मार्केट कॅप 1407 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची उच्चांकी भरारी 845.95 रुपये तर सर्वकालीन निच्चांक 429.40 रुपये आहे. सीटूसी ॲडव्हान्स सिस्टिम ही स्वदेशी संरक्षण उत्पादन निर्मिती करणारी कंपनी आहे. ती इलेक्ट्रॉनिक्स सोल्यूशन्स उपलब्ध करून देते. ही कंपनी वेळेत, रिअल टाईममध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि डाटा पुरवते.
मोठी झेप
या कंपनीच्या शेअरने NSE SME या विभागत 3 डिसेंबर रोजी 90 टक्क्यांसह 429.40 रुपयांवर एंट्री घेतली होती. या कंपनीच्या आयपीओ किंमतींपेक्षा सध्याची शेअरची किंमत 275 टक्के म्हणजे जवळपास तिप्पट पोहचली आहे. गेल्या एका आठवड्यात कंपनीच्या शेअरमध्ये 40.06 टक्क्यांची तेजी दिसून आली. या ताज्या घडामोडींमुळे गुंतवणूकदारांचे चांगभल झालं. हा शेअर तिप्पट वधारला. त्याने गुंतवणूकदारांना मालमाल केले.