Wednesday, March 12, 2025
HomeBlogविराट कोहलीला संताप अनावर, विमानतळावर थेट रिपोर्टशी भिडला, क्रिकेटच्या किंगचा व्हिडीओ व्हायरल

विराट कोहलीला संताप अनावर, विमानतळावर थेट रिपोर्टशी भिडला, क्रिकेटच्या किंगचा व्हिडीओ व्हायरल

भारताचा स्टार क्रिकेटपटून विराट कोहली (Virat Kohli) हा जगभरात चर्चेचा विषय असतो. त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मादेखील अनेकवेळी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. विराट कोहलीचे जगभरात लाखोंनी चाहते आहेत. माध्यमेदेखील विराट कोहलीच्या एका प्रतिक्रियेसाठी धडपडत असतात. दरम्यान, ब्रिसबेनमध्ये विराट कोहली एका रिपोर्टरवर चांगलाच भडकला आहे. रोहितचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार ऑस्ट्रेलियातील ब्रिसबेन येथे विराट कोहली आणि एका माध्यम प्रतिनिधीमध्ये वाद झाला. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा तिसरा कसोटी सामना संपल्यानंतर विराट कोहली ब्रिसबेनच्या विमानतळाहून होता. यावेळी माध्यमाच्या प्रतिनिधींनी विराट कोहलीचे फोटो घ्यायला सुरूवात केली. यावेळी विराट कोहलीसोबत त्याची मुलं होती. माध्यम प्रतिनिधी मुलांची फोटो घेत असल्याचे विराट कोहलीला आवडले नाही. याच कारणामुळे तो चांगलाच भडकल्याचं दिसलं. तुम्ही माझ्या कुटुंबीयांची प्रायव्हसी अशा प्रकारे भंग करू शकत नाही, असं विराट कोहली माध्यम प्रतिनिधीला बोलताना दिसतोय. 

ऑस्ट्रेलियातील माध्यमाचे प्रतिनिधी ऑस्ट्रेलिया वेगवान गोलंदाज स्कॉट बोलँड याच्याशी बातचीत करत होते. याच वेळी कोहली आणि त्याचे कुटुंबीय ब्रिसबेनच्या विमानतळावर आले. कोहली दिसताच माध्यमांनी त्याच्याकडे मोर्चा वळवला. Channel 7 या वृत्तवाहिनीच्या एका कॅमेऱ्याने विराट कोहली तसेच त्याच्या कुटुंबीयांवर आपला कॅमेरा रोखला. विराटच्या ही बाब लक्षात येताच तो भडकला. त्याने Channel 7 या वृत्तवाहिनीच्या रिपोर्टशी चर्चा केली. माझ्यासोबत मुलं आहेत. तुम्ही माझ्या प्रायव्हसीचा अशा प्रकारे अपमान करू शकत नाही, असं विराट कोहली या रिपोर्टशी बोलताना दिसतोय. 

दरम्यान, विराट कोहली भडकल्यामुळे माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आम्ही तुमची प्रायव्हसी अबाधित राखू. तुमच्या कुटुंबाचे फोटो घेणार नाही, असं आश्वासन दिल्यानंतर विराट कोहलीने रिपोर्टशी हात मिळवला आणि तेथून निघून गेला. दरम्यान, विराट भडकल्याचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -