औषधनिर्माण क्षेत्रातील नामवंत कंपनी सेनोरेस फार्मा आयपीओसाठी प्राईस बँड निश्चित करण्यात आला आहे. आयपीओ इश्यू खुला झाल्यानंतर गुंतवणूकदार रु. 372/- ते रु. 391/- प्राईसबँड नुसार गुंतवणूक बोली लावू शकणार आहेत.
कंपनीचा आयपीओ इश्यू शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी खुला होणार आहे. मंगळवार दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी बंद होईल. आयपीओद्वारे विक्रीस काढण्यात आलेल्या प्रत्येक समभागाचे फेस व्हॅल्यू रु. 10/- आहे. इच्छुक गुंतवणूकदार किमान 38 समभागांच्या एका लॉट साठी व त्यापुढे 38 समभागांच्या पटीत गुंतवणूकीसाठी बोली लावू शकणार आहेत.
कंपनीने आयपीओ माध्यमातून नवे आणि ऑफर फॉर सेल अंतर्गत समभाग विक्रीस काढले आहेत. नव्या समभागांच्या माध्यमातून रु. 500/- कोटी तर ऑफर फॉर सेल अंतर्गत विक्रीतून 21,00,000 समभाग विक्रीस काढण्यात आले आहेत. तसेच प्रस्तावित आयपीओ (IPO) ऑफरमध्ये 75,000 समभाग कंपनीच्या पात्र कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
भांडवल आणि वापर
कंपनी नव्या शेअर विक्रीतून मिळणाऱ्या भांडवलापैकी सुमारे 107 कोटी रुपये आपल्या हॅविक्स नामक उपकंपनीत गुंतवणुकीसाठी वापरणार आहे. हॅविक्स कंपनी ही रक्कम आपल्या भांडवली खर्चासाठी वापरणार आहे. या भांडवली खर्चातून कंपनी आपल्या अटलांटा कारखान्यात निर्जुंतक इंजेक्शन निर्मितीसाठी गुंतवणूक करणार आहे. तसेच रु. 73.48 कोटी रक्कम आधी घेतलेल्या कर्जाची परतफेड/मुदतपूर्वफेड करण्यासाठी वापरणार आहे. त्याचप्रमाणे एकूण भांडवलापैकी रु. 43.26 कोटी रक्कम कंपनी आपल्या खेळत्या भांडवली गरजासाठी वापरणार आहे. तसेच रु. 59.48 कोटी एसपीआय व रत्नाट्रीस या उपकंपन्यांना त्यांच्या खेळत्या भांडवली खर्चासाठी देण्यात येणार आहे. उपकंपन्या या रकमेतून अन्य कंपन्या ताब्यात घेणार आहेत. तसेच एकूण प्राप्त भांडवलापैकी काही भाग सामान्य कॉर्पोरेट हेतुंसाठी वापरण्यात येणार आहे.
सेनोरेस फार्मास्युटिकल्स कंपनीबाबत
सेनोरेस फार्मास्युटिकल्स कंपनी अत्यंत महत्वाच्या उपचारांसाठी आवश्यक इंजेक्शन व्यवसायात कार्यरत आहे. कंपनी आपल्या वितरक जाळ्याच्या माध्यमातून संपूर्ण भारतातील रुग्णालयांना क्रिटिकल केअर इंजेक्शनचा पुरवठा करते. तसेच कंपनी सार्क देश व देशांतर्गत बाजारासाठी एपीआयची निर्मिती देखील करते. कंपनी अत्यंत क्लीस्ट औषध उत्पादनांचा शोध घेवून त्यांचा विकास व निर्मिती करते. यामुळे महत्वाच्या ग्राहकांसाठी ही कंपनी अत्यंत महत्वाची भागीदार ठरली आहे. कंपनीने नियामक व उभरत्या बाजारपेठांवर लक्ष केंद्रीत करुन त्यानुसार डेटा ॲनॅलिटीक्स व संशोधन तसेच व्यवस्थापकीय अनुभवाच्या बळावर आपला ठसा उमटवला आहे. कंपनीला आपल्या उत्तम संशोधन व विकास क्षमतेमुळे दर्जावर भर देवून कॉम्प्लेक्स मॉल्युक्यूल सारखी विविध प्रकारची उत्पादने विकसित करणे शक्य झाले आहे.
कंपनीने आपल्या अमेरिका, कॅनडा, आणि युके येथील प्रॅस्को एलएलसी, ज्युबिलंट कॅडिस्टा फार्मास्युटिकल्स, ॲलकेम लॅबोरेटरीज लिमिटेड, सन फार्मास्युटिकल्स इंडस्टीज लिमिटेड, डॉ. रेडीज लॅबोरेटरीज इंकॉ आणि सिप्ला यूएसए इंकॉ या कंपन्यांच्या भागीदारीतून औषध निर्मितीची एक मालिका तयार केली आहे. त्याचप्रमाणे जगातील 43 उभरत्या बाजारपेठात कंपनीचे अस्तित्व आहे.
कंपनीचा व्यवसाय नियामक बाजारपेठांसाठी दोन मॉडेल्सनुसार चालतो. पहिले मॉडेल म्हणजे मार्केटेड प्रॉडक्ट्स (यात एएनडीए आणि सोर्स्ड उत्पादनांचा समावेश होतो). दुसरे मॉडेल म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरींग ऑपरेशन्स (सीएमओ). कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये 21 कमर्शिअलाईज्ड प्रॉडक्ट, 19 ॲप्रुव्ह्ड एएनडीए, 4 सीजीटी डेसिग्नेशन्स, 6 फाईल्ड एएनडीए, आणि 45 येउ घातलेल्या उत्पादनांचा समावेश आहे.
इक्विडस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड, ॲम्बिट प्रायव्हेट लिमिटेड, आणि नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड या कंपन्या आयपीओसाठी बुक रनिंग लीड मॅनेजरचे काम पाहात आहेत. तसेच लींक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आयपीओची रजिस्ट्रार कंपनी आहे.