Sunday, January 12, 2025
Homeमहाराष्ट्रडिसेंबरची ‘ओवाळणी’: बहिणींसाठी सरकारचा खास निर्णय!

डिसेंबरची ‘ओवाळणी’: बहिणींसाठी सरकारचा खास निर्णय!

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत नोव्हेंबरपर्यंतची रक्कम मिळाली आहे. हिवाळी अधिवेशनानंतर डिसेंबरची रक्कम दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच जाहीर केले. डिसेंबर महिना संपत आला, तरी बहिणींना अद्याप ‘ओवाळणी’ मिळालेली नाही. त्यामुळे (Government)सरकारच्या निर्णयाकडे ‘बहिणीं’चे लक्ष लागले आहे.

 

महायुती (Government)सरकारने राज्यातील गरीब महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली. योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा १५०० रुपये देण्याचे जाहीर केले. त्यानुसार, जुलै ते नोव्हेंबरपर्यंतचे साडेसात हजार रुपये सरकारने ‘बहिणीं’च्या खात्यात दिवाळीपूर्वीच जमा केले. दरम्यान, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली.

 

 

त्यामुळे सरकारने १५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत दिली होती. आचारसंहिता संपल्यानंतर प्रलंबित अर्जांची छाननी सुरू करण्यात आली. त्यानंतर त्रुटीयुक्त अर्ज बाद करण्यात आले. मंजूर अर्जदारांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडण्यात आले.

 

आता राज्यात पुन्हा महायुती सरकार सत्तेवर आले आहे. महायुतीने विधानसभा निवडणुकीत घोषणा केल्यानुसार, दरमहा रक्कम १५००रुपयांवरून २१०० करण्यात येणार आहे. त्याकडेही ‘बहिणीं’चे लक्ष लागले आहे. डिसेंबर संपत आला, तरी रक्कम खात्यात जमा न झाल्याने ‘बहिणी’ अस्वस्थ आहेत. नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपताच ‘लाडक्या बहिणीं’ना डिसेंबरचा हप्ता दिला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी नुकतेच जाहीर केले होते.

 

 

या पार्श्वभूमीवर डिसेंबरचा हप्ता कधी देणार, असा प्रश्न ‘बहिणी’ विचारत आहेत. सरकारने अधिवेशनानंतर रक्कम जमा होईल असे सांगितले असले, तरी ‘बहिणीं’च्या बँक खात्यात १५०० रुपयांचा हप्ता जमा होण्यास १५ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे बहिणींना नव्या वर्षातच हप्ता मिळण्याचा अंदाज आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -