शेतकऱ्यांसाठी चिंता वाढवणारी बातमी आहे, गेल्या आठवड्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढ होता, थंडी रब्बी पिकांसाठी पोषक मानली जाते. मात्र आत थंडीला ब्रेक लागणार असून, पुन्हा एकदा हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे.
दरम्यान हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार जर राज्यात पाऊस झाला तर याचा मोठा फटका हा रब्बी पिकांना विषेत: गहू ज्वारी या सारख्या पिकांना बसू शकतो.
सध्या उत्तरेकडून वारे वाहत आहेत, याचा परिणाम म्हणजे राज्यातील थंडी गायब झाली असून, पावसाला पोषक वातावरण निर्माण झालं आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, यामुळे राज्यात पुढील दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान नुसता पाऊस पडणार नसून, राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान विभागाकडून गारपिटीचा देखील इशारा देण्यात आला आहे. एकीकडे पाऊस तर दुसरीकडे गारपीट असं दुहेरी संकट महाराष्ट्रावर असणार आहे.
उत्तर भारतात येणारे कोरडे थंड वारे आणि अरबी समुद्रातून येणारी बाष्पयुक्त हवा यामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे, गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये ढागाळ वातावरण आहे.
दरम्यान ढगाळ वातावरणामुळे हरभाऱ्यासारख्या पिकांवर अळीचा प्रादुर्भाव होण्याची देखील शक्यता आहे, याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसू शकतो.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील दोन ते तीन दिवस गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मात्र त्यानंतर तीस डिसेंबरपासून राज्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढणार आहे.