Monday, January 6, 2025
Homeमहाराष्ट्र2025 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढणार

2025 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढणार

नवीन वर्ष 2025 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता (DA) वाढीच्या संदर्भात मोठ्या बातमीची समोर आली आहे. सध्या उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी 2025 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 56 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी दोनदा महागाई भत्त्याचा लाभ दिला जातो. यामध्ये जानेवारी आणि जुलै महिन्यात सुधारणा केली जाते. 2024 च्या जुलै महिन्यात महागाई भत्ता 50 टक्क्यांवरून 53 टक्के करण्यात आला होता. पण यावेळी अपेक्षित चार टक्क्यांच्या तुलनेत केवळ तीन टक्क्यांची वाढ झाली.

 

जानेवारी 2025 मध्ये वाढ –

आतापर्यंत जुलै ते ऑक्टोबर 2024 पर्यंतच्या अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (AICPI) आकडेवारीनुसार जानेवारी 2025 मध्ये महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. बाकी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांची आकडेवारी आल्यानंतरच ही वाढ निश्चित होईल. तसे पाहता महागाई भत्ता जानेवारी 2025 पासून लागू होईल, मात्र सरकारचा अंतिम निर्णय मार्च 2025 मध्ये अपेक्षित आहे. ही वाढ मागील महिन्यांपासून लागू राहील, त्यामुळे कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचा फरक देखील मिळेल.

 

2025 मध्ये महागाई भत्ता 56% –

दरवर्षी मार्च महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारणा होतात. त्यानुसार मार्च 2025 मध्ये महागाई भत्ता 56% होईल असे सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारने (central government) महागाई भत्त्यात तीन टक्क्यांऐवजी चार टक्क्यांची वाढ करावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. मात्र, सध्याच्या आकडेवारीनुसार, महागाई भत्ता फक्त तीन टक्क्यांनीच वाढणार असल्याचे चित्र आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही वाढ महत्त्वाची ठरणार असली तरी महागाईच्या पार्श्वभूमीवर अधिक लाभ मिळावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. आता याबाबत केंद्र सरकारचा निर्णय काय असेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -