Monday, January 6, 2025
Homeमहाराष्ट्रअवघ्या 2 रुपयांचा शेअर; पण खरेदीसाठी एकच झुंबड, गुंतवणूकदार काही मागे हटेनात

अवघ्या 2 रुपयांचा शेअर; पण खरेदीसाठी एकच झुंबड, गुंतवणूकदार काही मागे हटेनात

शुक्रवारी बाजार गडगडला तरी काही पेनी शेअरने धमाका केला. आठवड्याच्या अखेरच्या व्यापारी सत्रात मयूख डीलट्रेड लिमिटेडच्या शेअरमध्ये 10 टक्के तेजी दिसली. हा शेअर 2.11 रुपयांवर पोहचला

 

जानेवारी 2024 मध्ये हा शेअर 3.77 रुपयांवर ट्रेड करत होता. तर जुलै 2024 मध्ये या शेअरची किंमत 1.19 रुपयांपर्यंत खाली आली. आता या शेअरवर गुंतवणूकदार फिदा झाले आहेत.

 

मयूख डीलट्रेड कंपनी बोनस शेअर वाटणार असल्याने गुंतवणूकदारांनी खरेदीसाठी भाऊगर्दी केली आहे. कंपनी 3:5 प्रमाणात बोनस शेअर देणार आहे.

 

एक रुपयांचा फेस व्हॅल्यू असणारे प्रत्येक 5 शेअरवर 3 बोनस शेअर देणार आहे. त्यासाठी कंपनीने 17 जानेवारी 2025 ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे.

 

या कंपनीच्या प्रमोटर्सकडे 3.11 टक्के वाटा आहे. तर पब्लिक शेअरहोल्डिंग 96.89 टक्के इतका आहे. रोशन डीलमार्क प्रायव्हेट लिमिटेडकडे 36,83,600 शेअर म्हणजे 3.07 टक्क्यांची हिस्सेदारी आहे.

 

हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञाचा सल्ला आवश्यक घ्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -