Friday, June 27, 2025
Homeमहाराष्ट्रकरदात्यांसाठी मोठी खूशखबर? 10 लाखांपर्यंत टॅक्स नाही? वाचा स्पेशल रिपोर्ट

करदात्यांसाठी मोठी खूशखबर? 10 लाखांपर्यंत टॅक्स नाही? वाचा स्पेशल रिपोर्ट

केंद्र सरकार कोट्यवधी करदात्यांसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. 1 फेब्रुवारी रोजी जाहिर होणाऱ्या मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधल्या पहिल्या अर्थसंकल्पात कोट्यवधी करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

 

अर्थमंत्री निर्मला सितारमण या 10 लाखांपर्यंतच उत्पन्न करमुक्त करुन नोकरदारांना खूश करण्याची शक्यता आहे.

 

सध्या टॅक्सस्लॅब कसा आहे त्यावर एक नजर टाकूया..

 

पगार नवीन करप्रणाली

 

0-3 लाख 0%

 

3-7 लाख 5%

 

7-10 लाख 10%

 

10-12 लाख 15%

 

12-15 लाख 20%

 

15लाख+ 30%

 

जर 10 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त झालं तर कोणाला फायदा होईल ते देखील पाहूया..

 

मध्यम वर्ग मोठ्या आर्थिक तणावात

 

करकपात झाल्यास मध्यमवर्गाला मोठा दिलासा

 

करकपातीचा सर्वाधिक लाभ नोकरदार वर्गाला होणार

 

नोकरदारांच्या हाती अधिक पैसा येईल

 

ग्राहक खर्च वाढून अंतिमत: अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर पडण्यास मदत

 

देशात साडेसात कोटी करदाते असून त्यापैकी ७० टक्के लोक हे करमुक्त श्रेणीत येतात. पगारातून थेट टॅक्स कापला जात असल्यानं टॅक्सचा सर्वाधिक बोजा हा नोकरदार वर्गावर पडतो त्यामुळे जर 10 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त झालं तर त्याचा मोठा लाभ नोकरदारांना होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -