Wednesday, December 4, 2024
Homenewsवसईत अल्पवयीन अनाथ मुलीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक...

वसईत अल्पवयीन अनाथ मुलीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक…


वसईत एका 17 वर्षीय अनाथ मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी वसई रेल्वे पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. शुक्रवारी रेल्वे पोलिसांनी यातील तिसऱ्या आरोपीला अटक केली आहे. हे सर्व वसई विरारमध्ये पाण्याचे टॅंकर चालवतात.

पश्चिम रेल्वेचे डीसीपी प्रदीप चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, दादर रेल्वे स्थानकात दिनांक 2 ऑगस्टला तेथील रेल्वे पोलिसांना ही अल्पवयीन पीडित मुलगी प्लॅटफॉर्मवर बेशुद्ध अवस्थेत सापडली होती. तिची चौकशी केली असता, तिच्यावर घडलेला प्रकार लक्षात आला होता. तेथील पोलिसांनी तिला तात्काळ उपचारासाठी मुंबईच्या जे.जे. रुग्णालय भरती केलं होतं. त्यानंतर या मुलीवर बलात्कार झाल्याचं उजेडात आलं.

दिनांक 7 ऑगस्टला मुंबई सेंट्रल येथे सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर 8 ऑगस्टला हा गुन्हा तपासासाठी वसई रेल्वे पोलिसांकडे हस्तातंरीत करण्यात आला. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत वसई रेल्वेचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब बागल यांनी अवघ्या दोन दिवसातच दिनांक 10 ऑगस्टला पीडित मुलीने सांगितलेल्या पहिल्या नावावरुन, एका आरोपीला अटक केलं. त्यानंतर 13 ऑगस्टला दुसऱ्या आरोपीलाही अटक करण्यात यश मिळवलं. यातील तिसऱ्या आरोपीला शुक्रवारी दिनांक 28 ऑगस्टला वसई रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.

पीडित मुलीचे आई वडील नव्हते. वडिलांचा मृत्यू झाला होता. तर सावत्र आईने तिला रस्त्यावर सोडून दिलं होतं. त्यामुळे रस्त्यावर राहून, कुणी खायाला दिल्यावर ते खाऊन, ती आपला उदरनिर्वाह करायची. आणि खाण्याचं अमिष दाखवूनच या पीडित मुलीवर या तिघा नराधमांनी अत्याचार केला. या मुलीवर आणखी कुणी अत्याचार केले आहेत का? याचा शोध आता वसई रेल्वे पोलीस घेत आहेत. सध्या मुंबईतील रुग्णालयात मुलीवर उपाचार सुरु आहेत. त्यानंतर तिला बालसुधारगृहात पाठवण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -