ग्रामीण डाक सेवक भरतीला सुरुवात झाली आहे. GDS ने या भरतीचे आयोजन केले आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती एक सुवर्णसंधी आहे. जर तुम्ही रोजगाराच्या शोधात आहात तर या भरतीचा नक्कीच फायदा घ्या.
या भरती संदर्भात विशेष बातमी म्हणजे या भरतीच्या माध्यमातून २५,२०० रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा आयोजित केली जाणार नाही आहे. त्यामुळे भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना या एका गोष्टीचा फायदा होणार आहे. या भरती संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आले आहे. उमेदवारांना या अधिसूचनेचा आढावा घेता येणार आहे आणि या भरती संदर्भात महत्वाचे मुद्दे जाणून घेता येणार आहे.
ग्रामीण डाक सेवक पदासाठी आयोजित ही भरती ३ मार्च २०२५ पासून सुरु होणार आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी indiapostgdsonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. मुळात, उमेदवारांना एका ठराविक मुदतीपर्यंत या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या भरतीतही २८ मार्च २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात, या भरतीच्या संदर्भात पात्रता निकषांसंदर्भात:
या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवारांना काही अटी शर्ती पात्र कराव्या लागणार आहेत. या अटी शर्ती शैक्षणिक असावेत, तसेच उमेदवारांना वयोमर्यादेसंदर्भात अटी शर्ती पात्र करावे लागणार आहेत. या अटी शर्ती जाहीर अधिसूचनेमध्ये नमूद आहेत. एकंदरीत, किमान १८ वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर जास्तीत जास्त ४० वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांच्या वयोमर्यादेत काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. OBC प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अधिक ३ वर्षांची सूट दिली जाईल, तर SC आणि ST प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अधिक ५ वर्षांची सूट देण्यात येईल. तसेच दिव्यांग उमेदवारांना अधिक १० वर्षे सूट देण्यात येईल.
जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू पाहत आहात तर तुम्ही SSC उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. तसेच तुमच्या गुणपत्रिकेत गणित आणि इंग्रजी या दोन्ही विषयांचा समावेश हवा. संगणकाचे प्रशिक्षण प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. तसेच संगणकासंबंधित बेसिक ज्ञान असणे आवश्यक आहे.