Sunday, February 23, 2025
Homeमहाराष्ट्रअंगणवाडीत 6,500 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू; 'या' महिला करू शकतात अर्ज

अंगणवाडीत 6,500 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू; ‘या’ महिला करू शकतात अर्ज

अंगणवाडीमध्ये काम शोधणाऱ्या महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता अंगणवाडीत 6,500 हून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. या भरतीत 6,185 पदे अंगणवाडी सहाय्यकांसाठी तर 374 पदे अंगणवाडी कार्यकर्त्यांसाठी राखीव आहेत.

 

परंतु लक्षात घ्या की, उत्तराखंडमधील राज्यातच ही भरती प्रक्रिया सुरू आहे.

 

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा:

अंगणवाडी सहायिका पदांसाठी 5 वी पास, तर कार्यकर्त्या पदांसाठी 10वी किंवा 12वी पास महिलांना अर्ज करता येईल. अर्जदारांचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.

 

अर्ज प्रक्रिया आणि शेवटची तारीख:

अर्ज प्रक्रिया 2 जानेवारी 2025 पासून सुरू झाली असून 31 जानेवारी 2025 ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. इच्छुक महिला www.wecduck.in या वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

 

आवश्यक कागदपत्रं:

अर्जासाठी हायस्कूल आणि इंटरमीडिएट प्रमाणपत्र, स्थायी रहिवासी प्रमाणपत्र, कुटुंब नोंदणी प्रत, जात प्रमाणपत्र, तसेच प्राधान्य प्रमाणपत्र आवश्यक असेल. याशिवाय, कोणत्याही एका आंगणवाडी केंद्रावर एका कुटुंबातील दोन महिलांची नियुक्ती होणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -