भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएलच्या 18 व्या मोसमाआधी पंजाब किंग्सने नव्या कर्णधाराचं नाव जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे ‘बिग बॉस’ या रियालिटी शोमधून अभिनेता सलमान खान याने प्रिती झिंटाच्या संघाच्या नव्या कर्णधाराचं नाव जाहीर केलंय. मुंबईकर श्रेयस अय्यर याला पंजाब किंग्सचा कर्णधार करण्यात आलं आहे. पंजाब किंग्सनेही सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.
आयपीएलच्या 18 व्या मोसमासाठी पंजाब किंग्स टीम : श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंह आणि प्रभसिमरन सिंह, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल, मार्कस स्टोयनिस, ग्लेन मॅक्सवेल, नेहाल वढेरा, विष्णु विनोद, विजयकुमार वैशाक, यश ठाकुर, हरप्रीत ब्रार, प्रवीण दुबे, पायला अविनाश, जेवियर बार्टलेट, सूर्यांश शेडगे, मुशीर खान, एरॉन हार्डी, प्रियांश आर्य, कुलदीप सेन, हरनूर पन्नू, अझमतुल्लाह ओमरझई, लॉकी फर्ग्युसन, जॉश इंग्लिस आणि मार्को