सध्या सोशल मीडियावर टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर रिंकू सिंहच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. प्रिया सरोज आणि रिंकू सिंह यांचं लग्न फिक्स झालय असा सोशल मीडियावर दावा करण्यात येत आहे. शुक्रवारी दोघांचा रोका सोहळा झाला, अशी चर्चा आहे. लग्न किंवा रोकाबद्दल अजून कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. महत्त्वाच म्हणजे प्रिया सरोज या खासदार असून त्या अवघ्या 25 वर्षांच्या आहेत. प्रिया सरोज यांनी कायद्याच शिक्षण घेतलं आहे. सध्या त्या न्यायिक परीक्षेची तयारी करत आहेत. प्रिया सरोज यांच्या वडिलांच नाव तुफानी सरोज आहे. तुफानी यांनी तीनवेळा खासदारकी भूषवली आहे. सध्या ते केराकत विधानसभा क्षेत्रातून समाजवादी पार्टीचे आमदार आहेत. प्रिया सरोज या समाजवादी पार्टीच्या युवा खासदार आहेत. उत्तर प्रदेशच्या जौनपुर जिल्ह्यातील मछलीशहरमधून मागच्यावर्षी त्यांनी खासदारकीची निवडणूक जिंकली.
प्रिया सरोज या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीच्या तिकीटावर पहिल्यांदा खासदार बनल्या. पक्षाच्या त्या सर्वात युवा खासदार आहेत. राजकारणाशी त्यांच्या कुटुंबाच जुन नातं आहे. आधी त्यांचे वडिल खासदार होते. आता त्या स्वत: खासदार बनल्या. येणाऱ्या दिवसात प्रिया सरोज आणि रिंकू सिंह दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत, असा सोशल मीडियावर दावा करण्यात येतोय.
किती हजार मतांनी निवडणूक जिंकलेली?
प्रिया सरोज यांनी लोकसभा निवडणुकीत मछलीशहराचे विद्यमान भाजप खासदार बीपी सरोज यांना पराभूत करुन निवडणूक जिंकली होती. प्रिया सरोज यांनी बीपी सरोज यांच्यावर 35 हजारपेक्षा अधिक मतांनी विजय मिळवला होता. बीपी सरोज यांना एकूण 4 लाख 15 हजार 442 मतं मिळाली. तेच पहिल्यांदा मैदानात उतरलेल्या प्रिया सरोज यांना 4 लाख 51 हजार 292 मतं मिळाली.
शिक्षण कुठे झालय?
मीडिया रिपोर्टनुसार, प्रिया सरोज यांचा जन्म वारणसीमध्ये झाला. जौनपूर हा त्यांचा गृहजिल्हा आहे. प्रिया यांचं शालेय शिक्षण नवी दिल्लीत झालं. त्यानंतर त्यांनी दिल्ली विश्वविद्यालयाचून आर्ट्समधून पदवी घेतली. पुढे नोएडा येथील एमिटी यूनिवर्सिटीमधून LLB झाल्या. प्रिया आता न्यायिक परीक्षेची तयारी करत आहे.
रिंकू कधी चर्चेत आला?
रिंकू सिंह हा टीम इंडियाचा उदयोन्मुख स्टार आहे. रिंकू वर्ष 2023 च्या आयपीएलपासून चर्चेत आहे. त्यावेळी केकेआरकडून खेळताना रिंकूने गुजरात टायटन्स विरुद्ध शेवटच्या ओव्हरमध्ये 5 चेंडूत 5 षटकार ठोकून टीमला विजय मिळवून दिला. रिंकू सिंह यूपी अलीगढचा रहणारा आहे. टीम इंडियाच्या आक्रमक फलंदाजांमध्ये त्याची गणना