Tuesday, July 29, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजीत मांजा विक्री करणाऱ्या तिघा विक्रेत्यांवर कारवाई 

इचलकरंजीत मांजा विक्री करणाऱ्या तिघा विक्रेत्यांवर कारवाई 

तंग उडवण्यासाठी वापरण्यात येणारे सिंथेटिक मांजा, नायलॉन धागा आणि इतर तत्सम सिंथेटिक धाग्यांचे उत्पादन, विक्री, साठवणूक, खरेदी आणि वापर करण्यास मनाई असतानाही त्याच्या विक्री प्रकरणी महानगरपालिकेच्या विशेष पथकाकडून शुक्रवारी कोहिनूर सायकल कंपनी, पटवेगार प्लास्टिक आणि जनरल स्टोअर्स व सैफअली पतंग सेंटर अशा तिघा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.

 

चायनिज मांजा, नायलॉन धागा आणि इतर तत्सम सिंथेटिक धाग्यांचा वापर पतंग उडविण्यासाठी केला जातो. परंतु या धाग्यांमुळे दुर्घटना घडत असल्याने त्याचे उत्पादन व विक्री यावर बंदी घालण्यात आली आहे. या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांनी विशेष पथक स्थापना करुन शहरातील विविध ठिकाणी भेट देत अशा वस्तूंची विक्री होत असल्यास कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

 

त्यानुसार शुक्रवारी पथकाद्वारे झेंडा चौक व लायकर मळा येथे विक्रेत्यांवर कारवाई करत साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईत मुख्य स्वच्छता निरीक्षक रफिक पेंढारी, स्वच्छता निरीक्षक सचिन भुते, प्रभारी स्वच्छता निरीक्षक ओंकार शेटे, हर्षद कांबळे आणि ओंकार पोवार यांचा सहभाग होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -