गेल्या काही दिवसापासून हवामानात चढ उतार होताना दिसत आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात तापमानात 2 ते 3 अंशांची घट होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईतील तापमानही कमी होण्यास सुरवात झाली आहे, आणि पहाटेच्या वेळी जास्त थंडी वाढली आहे. पण अशी परिस्थिती असूनही , दुपारी जास्त उष्णता जाणवत आहे. हवामानाच्या अंदाजानुसार पुढील 48 तासांमध्ये हेच हवामान कायम राहू शकते. या स्थितीमुळे हवामान विभागाने पाऊसाचा इशारा दिला आहे. तर चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
तापमानात चढ-उतार (Weather Update) –
मध्य प्रदेश आणि केरळच्या किनारपट्टीवरील कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे, ज्यामुळे चक्राकार वाऱ्यांची निर्मिती होत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरी आणि पश्चिमी झंझावातांमुळे राज्यातील तापमानात जास्त बदल होताना दिसत आहेत. परिणामी, मुंबईसह इतर भागांमध्ये गारठा आणि उष्णेतेचा प्रभाव एकाच वेळी दिसून येत आहे.
आयएमडी आणि स्कायमेटचे पावसाचे इशारे –
हवामान विभागाने (Weather Update) उत्तर भारतासाठी कडाक्याच्या थंडीचा आणि जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. हिमाचल प्रदेशात हिमवृष्टीमुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. पश्चिम बंगाल, मणिपूर, मिझोरम, ओडिशा, आसाम, मेघालय आणि पूर्व राजस्थानमध्ये दाट धुक्यामुळे पावसाच्या सरी होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सतर्क राहण्याचा इशारा (Weather Update) –
आयएमडीच्या (IMD) अंदाजानुसार, अरुणाचल प्रदेशात पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील पश्चिम भाग, अंदमान-निकोबार बेट आणि लक्षद्वीपमध्येही पावसाची हजेरी लागू शकते . काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची स्थिती असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील काही दिवस हवामानाच्या बदलत्या (Weather Update) परिस्थितीमुळे राज्यातील काही भागांत जास्त तापमानासोबतच पाऊस, धुके आणि गारठा कायम राहण्याची शक्यता आहे.