लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जानेवारीचे १५०० रुपये महिलांना मिळण्यास सुरुवात झाली आहे.
त्यामुळे राज्य सरकारच्या लाडक्या बहिणींना आनंद झाला आहे.
लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. दरम्यान, २१०० रुपये देण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते.मात्र, हे २१०० रुपये कधीपासून देणार याबाबत माहिती समोर आलेली नाही. परंतु लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता जमा झाल्याने त्यांना खूप आनंद झाला आहे. काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहे. परंतु अद्याप काही महिलांना पैसे देण्यात आलेले नाहीत.
लाडकी बहीण योजनेत २६ जानेवारीपर्यंत सर्व लाभार्थी महिलांना पैसे दिले जाणार आहे. हप्त्याचे वितरण करण्यास सुरुवात झाली आहे. परंतु काही महिलांचे पैसे उद्यापर्यंत येतील, असं सांगितलं जात आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी करण्याची गरज नाही. त्यांना लवकरच पैसे मिळणार आहेत
लाडकी बहीण योजनेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले होते. १४ जानेवारी म्हणजेच मकरसंक्रांतीला महिलांना पैसे दिले जातील, असं सांगण्यात आले होते. मात्र, जानेवारी महिन्याचा शेवटचा आठवडा सुरु झाला तरीही पैसे न आल्याने महिला निराश झाल्या होत्या.परंतु आता पैसे येण्यास सुरुवात झाली आहे.
लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला की नाही? असं करा चेक
लाडकी बहीण योजनेत हप्ता आल्यावर तुमच्या मोबाईलवर मेसेज येणार आहे. त्यामुळे तुम्हाला पैसे आले की नाही के समजणार आहे. त्याचसोबत बँकेच्या मोबाईल अॅपवर जाऊन तुम्ही पैसे आले की नाही हे चेक करु शकतात. तुम्ही बँकेच्या अधिकृत अॅपवर जाऊन अकाउंट डिटेल्समध्ये जाऊन पैसे आलेत की नाही चेक करु शकतात.