Wednesday, March 12, 2025
Homeमहाराष्ट्रमहाविद्यालयीन निवडणुका पुन्हा सुरु होणार? मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

महाविद्यालयीन निवडणुका पुन्हा सुरु होणार? मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

1994 पासून महाविद्यालयीन निवडणुका बंद करण्यात आलेल्या होत्या. म्हणजेच आजच्या घडीला त्याला तब्बल 30 वर्ष होतील. या निवडणूका बंद करण्यामागे मुख्य कारण म्हणजे गुन्हेगारी वर्तनाचे प्रमाण वाढल्याचे सांगितले जात होते. पण यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविद्यालयात निवडणुका सुरू करण्याच्या बाबतीत गंभीर विचार करण्याची घोषणा केली आहे. यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी व गटांची लक्ष या निर्णयाकडे लागले आहे. हा निर्णय झाल्यास विद्यार्थाना कॉलेजमध्ये प्रतिनिधित्व करण्याची मोठी संधी मिळणार आहे. तर चला या महत्वपूर्ण बातमीबद्दल अधिक माहिती पाहुयात.

 

 

महाविद्यालयीन निवडणुका सुरू –

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे महाविद्यालयीन निवडणुका सुरू करण्याची मागणी केली होती, ज्यावर मुख्यमंत्री सकारात्मकतेने उत्तर दिले. त्याच वेळी, भाजप समर्थक अभाविप आणि काँग्रेसचे एनएसयुआय हे देखील निवडणूक पद्धती सुरू करण्यासाठी जोर देत आहेत. त्यामुळे विद्यार्थाना दिलासा मिळणार आहे.

 

निवडणुका विद्यार्थ्यांच्या नेतृत्व विकासासाठी –

मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाविद्यालयीन निवडणुका विद्यार्थ्यांच्या नेतृत्व विकासासाठी महत्त्वाच्या असल्याचे सांगितले. “महाविद्यालयीन निवडणुका आमचं नेतृत्व तयार करतात,” असे ते म्हणाले. महाविद्यालयातील निवडणुका बंद झाल्यामुळे, अनेक वर्षांपासून तरुण कार्यकर्त्यांची संख्या घटली असून, विद्यार्थ्यांच्या संघटनांचा प्रभाव कमी झाला आहे. सध्याच्या शैक्षणिक वातावरणात, खुल्या निवडणुकांच्या प्रक्रियेमुळे लोकशाही प्रक्रियेचा अधिक चांगला अनुभव घेता येईल. तसेच, विद्यापीठ कायद्याच्या आधारावर शैक्षणिक मुद्यांवर आधारीत निवडणुका होणे आवश्यक आहे. निवडणुका पुन्हा सुरू होण्याच्या या चर्चेमुळे महाविद्यालयीन परिसरात एका नव्या रणसंग्रामाची तयारी सुरू झाल्याचे दिसते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -