Saturday, January 17, 2026
Homeब्रेकिंगमोदी 3.0 सरकारचा केंद्रीय अर्थसंकल्प येथे पाहा, केव्हा आणि किती वाजता सादर...

मोदी 3.0 सरकारचा केंद्रीय अर्थसंकल्प येथे पाहा, केव्हा आणि किती वाजता सादर होणार बजेट? जाणून घ्या अपडेट

देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प, आज (1 फेब्रुवारी) सादर होईल. मोदी 3.0 सरकारच्या या बजेटकडे उद्योजक, व्यावसायिकांपासून ते सर्वसामान्यापर्यंत सर्वांचे लक्ष लागले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण या आज 8 व्यांदा देशाचे बजेट सादर करतील. केंद्रीय अर्थमंत्री आज सकाळी 11 वाजता बजेट सादर करतील. या अर्थसंकल्पाविषयी सर्वांना उत्सुकता आहे. सगळ्यांचे तिकडे लक्ष लागले आहे. बजेट तुम्हाला कुठे आणि कधी पाहायला मिळणार, हे जाणून घ्या एका क्लिकवर…

 

गेले वर्ष हे निवडणुकीचे वर्ष होते. लोकसभा निवडणूक असल्याने दोनदा बजेट सादर झाले. केंद्रीय अर्थंमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी 2024 रोजी अर्थसंकल्प सादर केला होता. तर लोकसभा निवडणुकीपूर्वी 23 जुलै 2024 रोजी 2024-25 या आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. लोकसभा निवडणुकीत एनडीए पुन्हा सत्तेत आली. आता दोन दिवसांनी पूर्ण बजेट सादर होणार आहे.

 

येथे पाहा देशाचा अर्थसंकल्प

 

तुम्ही देशाचा अर्थसंकल्प विविध प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. निर्मला सीतारमण यांचे अर्थसंकल्पीय भाषणाचे थेट प्रक्षेपण नेहमीप्रमाणे डीडी न्यूजवर पाहता येईल. याशिवाय डीडी नॅशनलवर सुद्धा अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण होईल. आता स्मार्टफोन एजच्या जमान्यात तुमच्या मोबाईलवर तुम्ही डीडी न्यूजच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरही केंद्रीय अर्थसंकल्प पाहू शकता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -