केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी शनिवारी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक मोठे निर्णय जाहीर केले. कृषी क्षेत्र, उद्योग, शिक्षण अशा विविध क्षेत्रांसाठी महत्वाच्या घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठी भेट देत किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ५ लाख रुपये करण्यात आली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. पुढील वर्षापासून मेडिकल कॉलेजमध्ये 10 हजार जागा वाढवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठी भेट देत किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ५ लाख रुपये करण्यात आली आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना शेतीसाठी किसान क्रेडिट कार्डवर केवळ 3 लाख रुपयांची मर्यादा मिळत होती.
स्टार्टअपसाठी सरकारच्या 10,000 कोटी रुपयांच्या योगदानातून निधीची व्यवस्था केली जाईल. पाच लाख महिला, एससी आणि एसटी उद्योजकांना सरकार प्रथमच 2 कोटी रुपयांचे कर्ज देणार आहे.
मत्स्यव्यवसाय क्षेत्राचे उत्पन्न टिकवून ठेवण्यासाठी एक कार्यक्षम फ्रेमवर्क आणण्यात येणार आहे.
मॅन्युफॅक्चरिंग मिशन लहान, मध्यम आणि मोठ्या उद्योगांना धोरण समर्थन आणि तपशीलवार फ्रेमवर्कद्वारे मेक इन इंडिया कार्यक्रमाला पुढे नेण्यासाठी कव्हर करेल.
आयआयटीची क्षमता वाढवण्यात येणार आहे. देशातील 5 IIT मध्ये अतिरिक्त पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. तसेच आयआयटी पटनाचा विस्तार करण्यात येणार आहे.
कर्करोगाच्या सर्व औषधी पूर्णपणे करमुक्त करण्यात येणार आहे. कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी संबंधित ३६ औषधे पूर्णपणे करमुक्त करण्यात आल्या आहेत. तसेच इतर जीवनावाश्यक औषधांच्या किंमती कमी करण्यात येणार आहे.
इंडिया पोस्टचे एका मोठ्या सार्वजनिक लॉजिस्टिक संस्थेत रुपांतर करण्यात येणार आहे.
पादत्राणे आणि चामड्याच्या क्षेत्रासाठी मदतीव्यतिरिक्त, चामड्याशिवाय पादत्राणांसाठी एक योजना आहे. 22 लाख रोजगार आणि 4 लाख कोटी रुपयांची उलाढाल आणि 1.1 लाख कोटी रुपयांहून अधिक निर्यात अपेक्षित आहे.
सूक्ष्म उद्योगांसाठी MSME क्रेडिट गॅरंटी कव्हर 5 कोटी रुपयांवरून 10 कोटी रुपयांपर्यंत वाढवले जाणार आहे. पुढील पाच वर्षांत 1.5 लाख कोटी रुपयांचे अतिरिक्त कर्ज प्रदान केले जाईल. किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.