Thursday, February 6, 2025
Homeमहाराष्ट्रकोण आहेत करुणा शर्मा? त्यांचा धनंजय मुंडेंशी काय संबंध?

कोण आहेत करुणा शर्मा? त्यांचा धनंजय मुंडेंशी काय संबंध?

मंत्री धनंजय मुंडे हे कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात दोषी ठरले असून करुणा शर्मा यांचे आरोप कोर्टाने मान्य केले आहेत. वांद्रे फॅमिली कोर्टाने धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत.

 

या निकालानंतर करुणा शर्मा आहेत तरी कोण आणि त्यांचा धनंजय मुंडे यांच्याशी नेमका संबंध काय, याविषयीची चर्चा सुरू झाली आहे. तर करुणा शर्मा हे नाव जानेवारी 2021 मध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदा चर्चेत आलं होतं. त्यापूर्वी या नावाची राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा होती.

 

मुंबईतल्या एका महिलेनं धनजंय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केल्यानंतर मुंडेंनी फेसबुकवर पोस्ट लिहून करुणा शर्मा यांच्याशी असलेलं नातं उघड केलं होतं. “करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबत माझे 2003 पासून परस्पर संमतीने संबंध आहेत. माझ्या कुटुंबीयांना, पत्नीला आणि मित्र परिवारालाही याबद्दलची माहिती आहे. परस्पर संमतीच्या संबंधातून आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. या दोन्ही मुलांना मी माझं नाव दिलंय. त्यांच्या शाळेच्या दाखल्यावर आणि इतर सर्व कागदपत्रांवर पालक म्हणून माझंच नाव आहे. ही मुलं माझ्यासोबतच राहतात. माझ्या कुटुंबीयांनी, पत्नीने आणि माझ्या मुलांनीही त्यांना कुटुंबीय म्हणून स्वीकृती दिली आहे”, असं त्यांनी लिहिलं होतं.

 

कोण आहेत करुणा शर्मा?

 

करुणा शर्मा या मूळच्या मध्य प्रदेशातील इंदूर इथल्या आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून त्या मुंबईत राहतात. मुंबईतील ‘जीवनज्योत’ या सामाजिक सेवा संस्थेशी संबंधित असल्याचं त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर लिहिलं आहे. सामाजिक कार्य करतानाचे त्यांचे काही फोटोसुद्धा सोशल मीडियावर पहायला मिळतात. करुणा शर्मा यांच्या फेसबुक अकाऊंटवर त्यांनी आपलं नाव ‘करुणा धनंजय मुंडे’ असं लिहिलं आहे.

 

दरम्यान याप्रकरणी धनंजय मुंडेंवर करुणा शर्मांनी केलेले आरोपी कोर्टाकडून अंशत: मान्य करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे या प्रकरणाचा शेवटचा निकाल येईपर्यंतत धनंजय मुंडेंनी घरगुती हिंसाचार करू नये, असं कोर्टाने म्हटलंय. मुंडेंनी करुणा यांना दर महिन्याला दोन लाख रुपये पोटगी द्यावी आणि या खटल्याचा 25 हजारांचा खर्चही मुंडेंनी द्यावा, असेही आदेश कोर्टाने दिले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -