ज्या महिला 12 वी उत्तीर्ण आहेत , त्यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महिला आणि बालविकास विभागाच्या (Women and Child Development Department) अंतर्गत एक जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिरातीच्या मार्फत मदतनीस , परिवेक्षिका आणि मुख्य सेविका अशी पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया सुरु झालेली आहे.
भरती प्रक्रियतेच्या आदेशावर स्वाक्षरी –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भरती प्रक्रियतेच्या आदेशावर स्वाक्षरी केली . तसेच हि भरती प्रक्रिया येत्या 100 दिवसात पूर्ण होईल , असेही सांगितले आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे ऑगस्ट 2022 मध्ये मदतनीस म्हणून निवड करण्यात आली त्या महिला जर 10 वी उत्तीर्ण असतील तर त्यांची थेट सेविकापदी नियुक्ती केली जाणार आहे. तर चला या भरतीसाठी काही विशेष नियम आणि अटी विभागाने दिलेल्या आहेत. याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पदाचे नाव (Anganwadi Bharti 2025)-
जाहिरातीनुसार मदतनीस, परिवेक्षिका आणि मुख्य सेविका पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 18 फेब्रुवारी 2025 (Anganwadi Bharti 2025)
आवश्यक प्रमाणपत्र –
या भरतीसाठी महिलांकडे रहिवासी दाखल असणे अनिवार्य आहे.