चारित्र्याच्या संशयावरून महिलेचा खून झाल्याची घटना काल शुक्रवारी उघडकीला आली. येथील स्वामी मळा परिसरात चारित्र्याच्या संशयावरुन झालेल्या वादात पतीने झोपलेल्या पत्नीच्या चेहऱ्यावर, गळ्यावर व मानेवर कोयत्याने वर्मी घाव घालत निर्घणपणे खून केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली.
सौ. मनिषा दिलीप धाबोत्रे (वय ४० रा.स्वामी मळा) असे मृत महिलेचे नांव आहे. तर पती दिलीप मनोहर धावोत्रे (वय ४५) हा खूनाच्या घटनेनंतर स्वतःहून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.