शिवनाकवाडी ता. शिरोळ येथे यात्रेदरम्यान अन्नातून विषबाधेची घटना घडल्याच्या तिसऱ्या दिवशीही १२० रुग्णांची पुनर्तपासणी करण्यात आली. गावातील १८३ जणांवर अद्याप इचलकरंजीतील आयजीएममध्ये उपचार सुरू असून काही रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शिवनाकवाडीतील परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी पांडूरंग खटावकर यांनी सांगितले. त्यामुळे गावातील शाळा तसेच हायस्कूल शुक्रवार पासून सुरू होत आहे.
सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, शिवनाकवाडी येथील आरोग्य उपकेंद्रात तीन आरोग्य पथक कार्यरत राहणार आहेत.
या पथकांची मदत रुग्णांना योग्य वेळेत उपचार मिळवून देण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. आरोग्य विभागाने सतर्कता ठेवून आवश्यक उपचार दिले आहेत, त्यामुळे भविष्यात परिस्थिती अधिक गंभीर होणार नाही, अशी आशा व्यक्त केली आहे.