सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. भारतीय रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) मध्ये हॉस्पिटॅलिटी मॉनिटर पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. ही भरती एकूण ६ जागांसाठी (Job Requirement) होणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
रिक्त पदे
या भरतीत २ पदे सर्वसाधारण (General) प्रवर्गासाठी, ३ पदे इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांसाठी, तर १ पद अनुसूचित जाती (SC) प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.
पात्रता आणि शिक्षण
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंटमध्ये बीएससी (B.Sc) पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय, भारतीय पाककला संस्थांमधून (Indian Culinary Institutes) बीबीए (BBA) किंवा एमबीए (MBA) केलेले उमेदवारही अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा आणि सवलती
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २८ वर्षांच्या आत असणे आवश्यक आहे. तसेच, आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाची सूट देण्यात आली आहे.
OBC प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्षांची सवलत
SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षांची सवलत
दिव्यांग (PwD) उमेदवारांना १० वर्षांची वयोमर्यादा सवलत
निवड प्रक्रिया आणि पगार
या भरतीसाठी उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ३०,००० रुपये पगार, तसेच अतिरिक्त भत्ते मिळतील. अंतिम निवडीनंतर उमेदवारांची मेडिकल टेस्ट घेतली जाईल, आणि ती यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यास २ वर्षांच्या करारावर (contract) नोकरी दिली जाईल.
अर्ज कसा कराल?
इच्छुक उमेदवारांनी IRCTC च्या अधिकृत वेबसाइट irctc.com वर जाऊन अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख ४ मार्च २०२५ आहे. तसेच, अधिक तपशीलांसाठी IRCTC Job Vacancy 2025 Notification डाउनलोड करून वाचावे.