Thursday, February 20, 2025
Homeमहाराष्ट्रमहाकुंभला पोहोचण्याआधीच काळाचा घाला, बोलेरोचा भीषण अपघात, 10 भाविकांचा जागीच मृत्यू

महाकुंभला पोहोचण्याआधीच काळाचा घाला, बोलेरोचा भीषण अपघात, 10 भाविकांचा जागीच मृत्यू

उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे भीषण अपघात झाला आहे. महाकुंभसाठी जाणाऱ्या यात्रेकरुंच्या बोलेरो कारची बस बरोबर टक्कर झाली. या भीषण अपघातात 10 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास प्रयागराज-मिर्झापूर हायवे वर हा भीषण अपघात झाला. बोलेरो छत्तीसगढ येथून प्रयागराज येथे महाकुंभसाठी चाललेली. बस महाकुंभवरुन वाराणसीच्या दिशेने जात होती. अपघातानंतर घटनास्थळी मन सुन्न करणारं दृश्य होतं. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. अपघातात 19 भाविक जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, बोलेरो कारमधील सर्व 10 भाविकांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. बसमधील 19 प्रवासी जखमी झाले आहेत. बस आणि बोलेरो कारची आमने-सामने टक्कर झाली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. अपघात इतका भीषण होता की, टक्कर झाल्यानंतर बोलेरो कारचा चेंदामेंदा झाला. गाडीतून मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना खूप कष्ट करावे लागले.

 

आवाज खूप दूरवरपर्यंत ऐकू आला

 

छत्तीसगढच्या कोरबा जिल्ह्यातील भाविक बोलेरो कारने संगमावर स्नान करण्यासाठी प्रयागराज महाकुंभ येथे निघाले होते. रात्री 2 वाजण्याच्या सुमारास बोलोरे प्रयागराज-मिर्जापुर हायवे वरील पुरा गावाजवळ पोहोचली. त्याचवेळी समोरुन येणाऱ्या बस बरोबर टक्कर झाली. ही धडक इतकी जोरदार होती की, हा आवाज खूप दूरवरपर्यंत ऐकू आला. अपघातानंतर बोलेरो कारची अवस्था खूप वाईट होती. अपघातानंतर घटनास्थळी एकच भिती, गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

 

पोलिसांनी लगेच जेसीबी मागवला

 

पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. अपघातानंतर बोलोरे कारचा चेंदामेंदा झालेला. त्यात लोक अडकलेले. पोलिसांनी लगेच जेसीबी मागवून घेतला आणि लोकांना बाहेर काढलं. बोलेरो कारमधील 10 जणांचा जागीच मृत्यू झाला. बसमधील 19 प्रवासी जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रामनगरच्या सामुदायिक स्वास्थ्य केंद्रात दाखल करण्यात आलं आहे. बसमधील भाविक मध्य प्रदेशच्या राजगढ जिल्ह्यातील रहिवासी आहेत. महाकुंभवरुन ते वाराणसीला जात होते. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -