भारतातील टेलिकॉम क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांमध्ये असलेल्या व्होडाफोन आयडिया (VI) ने अखेर 5G सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे VI ग्राहकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या रिलायन्स जिओ आणि एअरटेलकडून 5G सेवा सुरू आहे. या दोघांच्या शर्यतीत आता VI देखील उतरली आहे. कंपनीने आपल्या तिमाही अहवालात मार्च 2025 पासून 5G सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.
5G सेवेसाठी प्रथम पाच शहरांची निवड
VI ने आपल्या सुरुवातीच्या टप्प्यात पाच प्रमुख शहरांमध्ये 5G सेवा उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे. मुंबई हे पहिले शहर असेल जिथे ही सेवा सुरू केली जाणार आहे. त्यानंतर एप्रिल 2025 मध्ये दिल्ली, चंदीगड, बेंगळुरू आणि पटना येथे ही सेवा विस्तारली जाईल. यानंतर हळूहळू देशातील इतर मोठ्या शहरांमध्येही सेवा सुरू करण्यात येईल.
महत्वाचे म्हणजे, VI कंपनी आपल्या ग्राहकांसाठी अधिक किफायतशीर दरात 5G सेवा देण्याचा विचार करत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, VI चे 5G प्लॅन्स इतर कंपन्यांच्या तुलनेत 15% स्वस्त असू शकतात. यामुळे ग्राहकांना जलद इंटरनेट सेवेसह अधिक परवडणारे प्लॅन्स मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भारतीय दूरसंचार क्षेत्रात एअरटेलने सर्वप्रथम 5G सेवा सुरू केली होती. त्यानंतर रिलायन्स जिओने मोठ्या प्रमाणात देशभरात 5G सेवा उपलब्ध करून दिली. मात्र, VI चे ग्राहक बऱ्याच दिवसांपासून 5G ची वाट पाहत होते. आता VI ने देखील या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. VI ची 5G सेवा ही मार्च 2025 मध्ये सुरू होणार आहे. यानंतर एप्रिलमध्ये अन्य प्रमुख शहरांमध्ये ती सुरू केली जाईल. यामुळे VI च्या ग्राहकांना लवकरच हाय-स्पीड इंटरनेटचा अनुभव घेता येईल.