Saturday, February 22, 2025
Homeमहाराष्ट्र'या' दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार PM किसान सन्मान योजनेचा निधी!

‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार PM किसान सन्मान योजनेचा निधी!

भारत सरकार देशातील लोकांसाठी अनेक योजना राबवते. वेगवेगळ्या लोकांच्या गरजांनुसार, सरकार विविध प्रकारच्या योजना आणत असते. आजही, देशातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या शेती आणि शेतीतून आपला उदरनिर्वाह करते.

 

त्यामुळे सरकार विशेषतः शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या योजना आणते.

 

देशातील बहुतेक शेतकरी शेतीतून जास्त पैसे कमवू शकत नाहीत. अशा काही शेतकऱ्यांना सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते. यासाठी भारत सरकारने २०१८ मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेद्वारे सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण १८ हप्ते देण्यात आले आहेत.

 

आता देशातील १३ कोटींहून अधिक शेतकरी पुढील हप्त्याची म्हणजेच १९ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. मात्र, याबाबत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आधीच सांगितले आहे. १९ व्या हप्त्यातील पैसे या महिन्याच्या २४ तारखेला म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जातील. हा हप्ता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हस्तांतरित केला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.

 

ई-केवायसी करणे आवश्यक, अन्यथा…

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना भारत सरकारने आधीच याबद्दल माहिती दिली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे आवश्यक आहे. जे शेतकरी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करत नाहीत, त्यांना या योजनेचा लाभ मिळविण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे त्या शेतकऱ्यांचे हप्त्याचे पैसे अडकू शकतात. ज्यांनी ई-केवायसी केले नाही. त्या शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची सुविधा बंद आहे. तसेच, त्यांचा पुढचा हप्ताही अडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील हप्ता जारी होण्यापूर्वी, शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे आवश्यक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -