अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिता मंदाना स्टार ‘छावा’ सिनेमा 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफाम कमाई करताना दिसत आहे. सिनेमाने पाच दिवसांत 165 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात सिनेमा 200 कोटी रुपयांता टप्पा पार केला आहे. सोश मीडियावर आणि चाहत्यांमध्ये सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘छावा’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. एकेकडे सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलीच मजल मारत आहे तर, दुसरीकडे सिनेमाचं प्रदर्शन थांबवण्याची मागणी करण्यात येत आहे.
‘छावा’ सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्याच्या पाच दिवसांनंतर सिनेमाचं प्रदर्शन थांबवण्याची मागणी होत आहे. सिनेमा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसत आहे. संभाजी ब्रिगेड आणि इतिहास संशोधकांनी चित्रपटातील ऐतिहासिक विकृतीकरणावर आक्षेप घेतला आहे.
संभाजी महाराज आणि सोयराबाईंबाबत चुकीचे प्रसंग दाखवल्याचा आरोप संभाजी ब्रिगेड आणि इतिहास संशोधकांनी केला आहे. याबाबत सेन्सॉर बोर्डाकडे निवेदन सादर करण्यात आल्याची देखील माहिती मिळत आहे. योग्य पडताळणी न करता मंजुरी दिल्याची तक्रार देखील केली आहे. शिवाय ओटीटी आणि अन्य माध्यमांवर प्रदर्शन रोखण्यासाठी कारवाईची मागणी देखील करण्यात आली आहे. आता याप्रकरणी पुढे काय होत पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सांगायचं झालं तर, ‘छावा’ सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी देखीव वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास मांडणारा बहुप्रतिक्षित ‘छावा’ या हिंदी सिनेमाच्या ट्रेलरवरून वाद निर्माण झाला होता. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील एका दृश्यावरून विविध स्तरांतून आक्षेप घेण्यात आला होता.
छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणाी येसूबाई यांचा लेझीम नृत्य करतानाचा हा प्रसंग होता. अखेर सिनेमातून लेझीम नृत्य करतानाचा सीन वगळ्यानंतर सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. सध्या सर्वत्र ‘छावा’ सिनेमाची चर्चा रंगली आहे.