Friday, February 21, 2025
Homeमहाराष्ट्रकिसान सन्मान निधी योजनेच्या १९ व्या हप्त्याची तारीख ठरली; कधी मिळणार हप्ता?

किसान सन्मान निधी योजनेच्या १९ व्या हप्त्याची तारीख ठरली; कधी मिळणार हप्ता?

किसान सन्मान निधी योजनेचा माहे डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ कालावधीतील १९ वा हप्ता मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते दिनांक २४ फेब्रुवारी, २०२५ रोजी दुपारी ०२.१५ वा.

 

ते ०२.३० वा. या कालावधीत भागलपूर, बिहार येथील समारंभात वितरीत होणार आहेत.

 

सदर कार्यक्रम देशामध्ये “किसान सन्मान समारोह” म्हणून सर्वदूर आयोजित करण्यात आलेला आहे. केंद्र शासनाने शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी. एम. किसान) योजना माहे फेब्रुवारी, २०१९ पासून सुरु केली आहे.

 

या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षाखालील अपत्ये) रु. २०००/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रू. ६०००/- त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहे.

 

पी. एम. किसान योजने अंतर्गत राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना यापुर्वी एकूण १८ हप्त्यांमध्ये सुमारे रू. ३३,५६५ कोटीचा लाभ जमा झालेला आहे.

 

पी एम किसान योजनेच्या लाभासाठी केंद्र शासनाने लाभार्थीने भूमी अभिलेख नोंदणी अद्यावत करणे, बँक खाते आधार संलग्न करणे, ई-केवायसी प्रमाणिकरण करणे या बाबी बंधनकारक केलेल्या आहेत.

 

राज्यातील सद्यस्थितीत या तीनही बाबीची पूर्तता केलेल्या एकूण

९२.८९ लाख शेतकरी कुटुंबांना दिनांक २४ फेब्रुवारी, २०२५ रोजी सुमारे रक्कम रुपये १९६७ कोटींहून अधिक रक्कमेचा लाभ त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे.

 

राज्यातील कृषी विज्ञान केंद्र तसेच जिल्हा, तालुका व ग्राम पंचायत स्तरावर सदरचा समारोह आयोजित करण्यात येत आहे. सदरहु समारंभाच्या वेळी प्रगतशील शेतकरी कृषि शास्त्रज्ञ, निमंत्रित मान्यवर, तसेच शेतकरी यांच्या उपस्थितीत चर्चासत्र, प्रदर्शने, विविध योजनांची माहिती व लाभ वितरण इ. कार्यक्रमाचा समावेश करण्यात आला आहे.

 

राज्यात वेगाने सुरु असलेल्या अग्रीस्टॅक योजनेंतर्गत शेतकरी माहिती संच तथा फार्मर आयडी बनविण्यासाठीची नोंदणी नागरी सुविधा केंद्रांवरुन करण्यात येत आहे. सदरहु ठिकाणांवरुनही या समारोहाचे थेट प्रक्षेपणामध्ये सहभागी होता येईल.

 

मा. मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य व मा. कृषी मंत्री महोदय हे सदरहु समारोहास सातारा येथून सहभागी होणार आहेत. राज्यांमध्ये सर्वदूर कृषि विभाग, महसूल व वने विभाग, ग्राम विकास विभाग तसेच कृषी विज्ञान केंद्र, शेतकरी उत्पादन संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने सदरचा समारोह साजरा करण्यात येणार आहे.

सदरच्या समारोहाचे थेट प्रक्षेपण केंद्र शासनाच्या https://pmindiawebcast.nic.in या लिंक वरून होणार आहे. सदरच्या लिंकचा वापर करून राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी बंधु भगिनींनी या समारोहामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -