Friday, February 21, 2025
Homeमहाराष्ट्रलाडकी बहीण योजनेत 6 मोठे बदल, तुमचे 1500 रुपये बंद होणार का?

लाडकी बहीण योजनेत 6 मोठे बदल, तुमचे 1500 रुपये बंद होणार का?

लाडकी बहीण योजनेतील 9 लाख महिला लाभार्थी बाद ठरणार आहेत. यापूर्वी 5 लाख महिला कमी झालेल्या होत्या, तर आता नव्याने 4 लाख महिलांची संख्या कमी होणार. त्यामुळे राज्य सरकारच्या 945 कोटी रुपयांची बचत होणार आहे.

 

कोणत्या नव्या निकषांमुळे लाडक्या बहिणी अपात्र ठरणार, याची सुधारित माहिती समोर आली आहे.

अडीच लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येईल. एकावेळी एकाच योजनेचा लाभ घेता येईल किंवा पंधराशे पेक्षा जास्त लाभ घेता येणार नाही.

चारचाकी वाहन कुटुंबात असेल तर योजनेचा लाभ घेता येणार नाही. शासकीय नोकरीत महिला असेल तर लाभ घेता येणार नाही. जर महिला परराज्यामध्ये विवाह करून स्थायिक झाली असेल त्याही महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही.

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत ई-केवायसी करुन हयातीचा दाखलाही जोडावा लागणार आहे. दरवर्षी १ जून ते १ जुलै दरम्यान ई-केवायसी करावी लागणार आहे.

या योजनेतील सुमारे 16.5 लाख महिलांच्या खात्यावर थेट पैसे पाठविण्यात आल्यानंतर त्यांनी अर्जात दिलेली नावे आणि पैसे जमा झालेल्या बैंक खात्यावरील नावे यात तफावत आढळून आली आहे. अशा महिलांना लाभ मिळणार नाही.

ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल, त्यांनाही या योजनेतून बाद केले जाणार आहे.

नमो योजना किंवा दिव्यांग विभागातील योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना एकत्रित 1500 रुपयांचा लाभ मिळेल, त्यापेक्षा अधिक पैसे मिळणार नाहीत. यासाठी प्रत्येक विभागातून माहिती घेण्याचे काम सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -