राज्य शासनाने लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आणली आहे. आता शिधापत्रिकाधारक कुटुंबांना दरवर्षी एक साडी रेशन दुकानातून वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अंत्योदय रेशन कार्डधारक महिलांना यंदा होळीपर्यंत मोफत साडी मिळणार आहे. या उपक्रमामुळे विविध ठिकाणच्या महिलांना लाभ मिळणार आहे. पुणे जिल्ह्यातील सुमारे 48,874 महिलांना सरकारकडून हे गिफ्ट मिळणार आहे.
तालुक्यानुसार साडी वितरणाची योजना –
तालुक्यानुसार साडी वितरणाची योजना राबवून, अंत्योदय कार्डधारक महिलांना सणाच्या वेळेस एक मोठा आनंद देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आंबेगाव तालुक्यात 5,137 साड्या, बारामतीत 7,975, भोरमध्ये 1,909, दौंडमध्ये 7,222, हवेलीमध्ये 251, इंदापुरमध्ये 4,453, जुन्नरमध्ये 6,838, खेडमध्ये 3,218, मावळात 1,536, मुळशीमध्ये 540, पुरंदरमध्ये 5,285 आणि शिरूरमध्ये 3,990 साड्या वितरित केली जात आहेत. या वितरणामुळे महिलांना सणाच्या खास प्रसंगी पारंपारिक पोशाख मिळाल्याने त्यांच्यात आनंद आणि उत्साह निर्माण होण्यास मदत मिळणार आहे.
रेशन दुकानावर अन्नधान्यासोबतच साडी मोफत मिळणार –
अंत्योदय शिधा पत्रिकाधारक कुटुंबांना रेशन दुकानावर अन्नधान्यासोबतच एक साडी मोफत मिळणार आहे. सरकारने निश्चित केलेल्या सणाच्या दिवशी या साड्यांचे वितरण करण्यात येणार आहे, ज्यामुळे महिलांना सणासुदीच्या वेळेस आनंदाचा अनुभवता येणार आहे. साडी वाटपाचं काम वस्त्रोद्योग विभागाकडून होणार असून, सर्वाधिक अंत्योदय कार्डधारक बारामती तालुक्यात आहेत .