Sunday, July 27, 2025
Homeमहाराष्ट्रकर्नाटकात जाणारी 'लालपरी'ची चाकं थांबली, कोल्हापूर, सोलापूर, सांगलीसह सीमावर्ती भागातल्या नागरिकांची गैरसोय

कर्नाटकात जाणारी ‘लालपरी’ची चाकं थांबली, कोल्हापूर, सोलापूर, सांगलीसह सीमावर्ती भागातल्या नागरिकांची गैरसोय

कर्नाटकमध्ये महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या चालकाला मारहाण केल्यानंतर महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारी वाहतूक थांबवलेली आहे.

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी तसे आदेश दिले आहेत… केवळ कोल्हापुरातूनच नाही तर सर्वच आगारातून कर्नाटकात एसटी बसची सेवा थांबवली आहे…

त्यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांची मात्र गैरसोय होत असल्याचे समोर येत आहे.

कोल्हापूर, सांगली सोलापूर या सीमेलगतच्या जिल्ह्यातून खूप मोठ्या संख्येने प्रवासी दोन राज्यात ये जा करत असतात.

या घटनेचे पडसाद पुण्यासह कोल्हापुरात देखील उमटल्याचं बघायला मिळालं. ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं. यावेळी कर्नाटकातील बसेलला आंदोलकांनी काळं फासत निषेध नोंदवला होता

कर्नाटकात चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र एसटी मंडळाच्या एसटी बससह चालकाच्या तोंडाला काळं फासल्याची धक्कादायक घटना घडली. कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी चालकाला मारहाण करत तोंडाला काळं फासलं होतं. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -