Tuesday, May 21, 2024
Homeकोल्हापूरअणुस्कूरा घाटात दरड कोसळली, चार तासानंतर वाहतूक पूर्ववत

अणुस्कूरा घाटात दरड कोसळली, चार तासानंतर वाहतूक पूर्ववत

राजापूर ,कोल्हापूर जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात मंगळवारी आज (दि.१४) सकाळी आठ वाजता मोठ्याप्रमाणावर दरड कोसळून संपूर्ण वाहतूक बंद झाली होती. दरम्यान ,सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दरड हटवली. चार तासानंतर दरड हटवून घाटातील सर्व प्रकारची वाहतूक पूर्ववत सुरु करण्यात आली.

जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत जिल्ह्यातील आंबा घाटांसह कोल्हापूरला जोडणाऱ्या अन्य घाटातील वाहतूक बंद झाली होती. केवळ अणुस्कुरा घाट मार्गेच वाहतुक सुरु आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक वाढली आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी घाटात दरड कोसळून मोठमोठ्या दगडांसह भला मोठा मातीचा ढिगारा रस्त्यावर येवून पडला. यामुळे घाटमार्गे असलेली वाहतूक बंद पडली होती.

घाटात दरड कोसळल्याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभाग राजापूरचे उपअभियंता एस. एस. दुधाडे, शाखा अभियंता स्वप्निल बावधनकर आणि त्या विभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी हजर झाले. राजापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक जनार्दन परबकर व त्यांचे सहकारी देखील घाटात दाखल झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -