Monday, March 3, 2025
Homeराजकीय घडामोडीधनंजय मुंडे फक्त एक आमदार, मंत्री नाहीत तर…; करुणा शर्मांचा आतापर्यंतचा सर्वात...

धनंजय मुंडे फक्त एक आमदार, मंत्री नाहीत तर…; करुणा शर्मांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

मोठी बातमी समोर येत आहे, करुणा शर्मा यांनी आता मंत्री धनंजय मुंडेंबाबत आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. शंभर टक्के दोन दिवस अगोदरच धनंजय मुंडे यांचा राजीनामा लिहून घेतलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी आज सांगितलं दोन दिवसानंतर आम्ही ठरवू असं करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे. धनंजय मुंडे यांच्यावर पार्टीमध्ये दबाव आहे, मात्र त्यांची राजीनामा देण्याची इच्छा नाही, अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये लोकांचं आणि स्वत:च्या पक्षातील आमदार, खासदारांचं किती प्रेशर येतं? ही गोष्ट थांबवता येऊ शकते का? हे पाहून त्यांच्या राजीनाम्यावर निर्णय होणार आहे, असा दावा करुणा शर्मा यांनी केला आहे.

 

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मला मंत्रालयातून माहिती मिळाली आहे, माझे काही लोक आहेत, त्यांच्याकडून मला माहिती मिळाली आहे. सर्वांना माहिती आहे, धनंजय मुंडे हे छोटा मोठा आमदार किंवा मंत्री नाहीत, जो अजितदादा गट आहे, तो अजितदादा गट नसून धनंजय मुंडे गट आहे. त्यामुळे स्वत:च्या पक्षात स्वत:ची चालणार. पक्ष त्यांचा आहे मी एवढ्या वर्षांपासून त्यांच्यासोबत आहे, मला सर्व माहिती आहे. त्यामुळे मी हे सगळं ठोकपणे सांगते.

 

धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची कोणात ताकद नाही, मात्र सध्या जे प्रेशर वाढत चाललं आहे, त्यासाठी त्यांचा राजीनामा दोन दिवसापूर्वी अजितदादा यांनी घेतला आहे. मात्र त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की, दोन दिवसांनंतर आम्ही या गोष्टीवर निर्णय घेणार आहोत, त्यामुळे ही गोष्ट आता दोन दिवस पुढे ढकलेली आहे.

 

मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटीसाठी निवेदन दिलेलं आहे, मात्र त्यांनी मला आतापर्यंत भेटीसाठी वेळ दिला नाही. आता मी त्यांना पुन्हा एकदा आठवण करून देण्यासाठी पत्र देत आहे, त्याचबरोबर विधानभवनात जाण्याचाही प्रयत्न करणार आहे. माझी रोखठोक भूमिका आहे, त्यामुळे मला तिकडे जाऊ देणार नाहीत. मात्र त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करणार आहे, आणि देवेंद्र फडणीस यांना भेटण्याचाही प्रयत्न करणार आहे, असं करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे.

 

त्यांचा राजीनामा घेतला नाही तर अंजली दमानिया, सुरेश धस या सगळ्यांसोबत मिळून आम्ही पूर्ण महाराष्ट्रात असे लोक मंत्रालयात नको यासाठी महाराष्ट्राला जागृत करणार आहोत, असंही यावेळी करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -