उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये मैत्रिणीमुळे एका मुलीच लग्न मोडलं. गांधीपार्क क्षेत्रातील हे प्रकरण आहे. इथे एका हॉटेलमध्ये रविवारी रात्री रिंग सेरेमनीचा कार्यक्रम सुरु होता. त्याचवेळी अचानक तिथे एक युवती आली. ती नवरीमुलीला खेचत स्टेजनवरुन आपल्यासोबत एका खोलीमध्ये घेऊन गेली. ती रुम त्यांनी बंद केली. हा प्रकार पाहिल्यानंतर तिथे बराच गदारोळ झाला. त्यानंतर नवऱ्याला तिथे अशी एक गोष्ट समजली की, त्याने लग्नच मोडलं. नवरीच्या मैत्रिणीने दावा केला की, त्या दोघींमध्ये समलैंगिक संबंध आहेत. ही गोष्ट समोर येताच नवरीच्या नातेवाईकांनी तिच्या मैत्रिणीला मारहाण सुरु केली. नवरी मुलीने सुद्धा तिचा हा दावा फेटाळून लावला. नवरीने मैत्रिणीला ओळख दाखवायला सुद्ध नकार दिला. पण युवतीने असे काही पुरावे दाखवले की, त्यामुळे हे नातं मोडलं.
बुलंदशहरातील पहासू क्षेत्रातील युवतीच लग्न क्वार्सी क्षेत्रातील युवकासोबत ठरलं होतं. रविवारी गांधीपार्क बस स्टँडजवळ एका हॉटेलमध्ये रिंग सेरेमनीचा कार्यक्रम सुरु होता. मुलगा-मुलगी दोघे स्टेजवर होते. त्याचवेळी सफेद शर्ट आणि पँट घातलेली युवती तिथे आली. नवरी बनायला निघालेल्या मुलीचा तिने हात पकडला. तिला आपल्यासोबत ओढत घेऊन गेली. यावेळी दोघींमध्ये हाणामारी सुद्धा झाली. दोन्हीकडच्या कुटुंबियांना हे काय घडतय ते समजत नव्हतं.
एकतासाने दोघी खोली बाहेर आल्या
युवती नवरीला आपल्यासोबत एका खोलीत घेऊन गेली. बाहेरुन नातेवाईक दरवाजा ठोठावत होते. पण दोघी बाहेर आल्या नाहीत. या सगळ्यामध्ये कोणीतरी पोलिसांना माहिती दिली. एकतासाने दोघी खोली बाहेर आल्या. त्यावेळी युवतीने सांगितलं की, तिचे नवरी मुलीसोबत चार वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. यावर वधू पक्षाकडचे लोक आक्रमक झाले. युवतीला त्यांनी मारहाण सुरु केली. दुसऱ्याबाजूला नवरी मुलगी सुद्धा हे नातं नाकारत होती. मी या मुलीला ओळखत नाही, असं सुद्धा नवरी मुलगी म्हणाली. पण युवतीने नवरीमुलीसोबत तिचे संबंध असल्याचे अनेक पुरावे दाखवले. वधूच्या नातेवाईकांनी दुसऱ्या युवतीला एका खोलीत बंद केलं. त्याचवेळी पोलीस तिथे आले. हे सगळं पाहून मुलाकडच्या मंडळींनी हे लग्न मोडलं.
माझ्या प्रेयसीने माझ्यावर दबाव आणला
दुसऱ्या युवतीच नाव बिना आहे. शाळेपासूनच मागच्या चार वर्षांपासून समलैंगिक संबंधात असल्याच तिने सांगितलं. दोघींमध्ये लग्न करण्याबद्दल बोलणं व्हायचं. मी लग्न करणार होते. पण माझ्या प्रेयसीने माझ्यावर दबाव आणला. तिने जीवन संपवण्याची धमकी दिली. त्यानंतर मी माझं लग्न थांबवलं. पण ती मला सोडून दुसऱ्याकोणाबरोबर लग्न करणार होती असं बिनाने सांगितलं.