राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये कर्करोगाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता कॅन्सर रुग्णांसाठी सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे.
यामध्ये मुलींना आता कॅन्सरची लस मोफत मिळणार आहे. 14 वयापर्यंतच्या मुलींसाठी ही लस मोफत दिली जाणार जाणार आहे.
स्तनांच्या कॅन्सरसाठी लवकरच ही लस दिली जाणार आहे. महिलांसाठीच्या कॅन्सरसाठी ही लस पुढच्या 5 ते 6 महिन्यांत उपलब्ध होईल. देशात आणि राज्यातही कॅन्सरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यासाठी राज्य सरकारने हे मोठं पाऊल उचलले आहे. यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे.
राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये कॅन्सरच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यासंदर्भात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “जीवनशैली बदलल्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागात सुद्धा आता कॅन्सरचं प्रमाण वाढताना दिसतंय. पूर्वी व्यसन असल्यावर कॅन्सर व्हायचा. पण, आता लहान मुलांनाही कर्करोग होताना दिसतंय. ही खूपच चिंतेची बाब आहे.” राज्यातील ० ते १४ वयोगटातील मुलींना एचपीव्हीची लस मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याची माहिती आबिटकर यांनी दिली.
देशात कॅन्सरचं प्रमाण वाढले
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि नॅशनल सेंटर फॉर डिसीज इन्फॉर्मेटिक्स अँड रिसर्च (NCDIR) च्या मते, “गेल्या काही वर्षांपासून भारतात कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.”
येत्या काही वर्षांत जगभरात स्तनाच्या कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण वाढणार असल्याचं WHO ची कॅन्सर संस्था आणि इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (IARC) यांनी म्हटलं आहे. त्यांनी यापूर्वी केलेल्या अभ्यासातून जगात दर मिनिटाला एका महिलेचा ब्रेस्ट कॅन्सरने मृत्यू होत असल्याचं समोर आलं आहे.