आज 4 मार्च 2025 रोजी सोन्याच्या भावात थोडीशी घसरण झाली आहे. मंगळवारी देशातील मोठ्या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 86,600 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव 79,300 रुपयांच्या वर आहे.
एक किलो चांदीचा भाव 96,900 रुपयांच्या पातळीवर आहे.
डॉलरच्या तेजीमुळे सोन्याच्या भावात थोडीशी घसरण झाली आहे. मेहता इक्विटीजचे राहुल कलंत्री यांच्या मते, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी मेक्सिको आणि कॅनडावर नवीन आयात शुल्क लागू केल्यानंतर डॉलर मजबूत झाला, ज्यामुळे सोन्याची मागणी कमी झाली. तसेच फेडरल रिझर्व्ह व्याजदर कपात पुढे ढकलणार असल्याच्या शक्यतेमुळे सोने बाजारावरील दबाव वाढला आहे.
दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव 79,540 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 86,760 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 79,390 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 86,610 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
सोन्याची किंमत कशी ठरवली जाते?
आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमती, सरकारी कर आणि रुपयाच्या मूल्यातील चढ-उतार अशा अनेक कारणांमुळे भारतातील सोन्याची किंमत सतत बदलत असतात. सोने हे केवळ गुंतवणुकीचे साधन नाही तर आपल्या परंपरा आणि सणांचाही एक महत्त्वाचा भाग आहे. विशेषत: लग्नसमारंभ आणि सणांमध्ये त्याची मागणी वाढते.
मिस्ड कॉलद्वारे तुम्ही सोन्या-चांदीची किंमतही तपासू शकता. यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या 8955664433 क्रमांकावर कॉल करावा लागेल. मिस्ड कॉलच्या काही वेळानंतर तुम्हाला एसएमएसद्वारे दर कळू शकतात. याशिवाय, तुम्ही अधिकृत वेबसाइट ibjarates.com वर जाऊन दर तपासू शकता.