नोकरीचा शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही बातमी महत्त्वाची ठरू शकते. कारण, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (MSCB) नाशिक परिमंडळात अभियांत्रिकी प्रशिक्षणार्थी पदांसाठी मोठ्या संख्येने भरती (Job Requirement) प्रक्रिया सुरू करत आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची संधी आहे. या भरतीअंतर्गत एकूण 70 प्रशिक्षणार्थी पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
पदसंख्या आणि पात्रता
महावितरणच्या नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी अभियांत्रिकी पदवीधारकांसाठी 41, अभियांत्रिकी पदविकाधारकांसाठी 13 आणि कला-वाणिज्य शाखेतील पदवीधारकांसाठी 16 अशी एकूण 70 पदे उपलब्ध आहेत. हे प्रशिक्षणार्थी 2025-26 या कालावधीसाठी नियुक्त केले जाणार आहेत.
अटी आणि शर्ती
उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असावी. अभियांत्रिकी शाखेसाठी बीई (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनिअरिंग) किंवा बी.टेक. (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनिअरिंग) पदवी आवश्यक आहे. पदविकाधारक उमेदवारांसाठी डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आवश्यक आहे, तर कला आणि वाणिज्य शाखेतील उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून 10+2+3 पॅटर्ननुसार पदवी घेतलेली असावी. याशिवाय, कला व वाणिज्य शाखेतील उमेदवारांनी MS-CIT परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड त्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे. 5 मार्च 2025 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5.30 या वेळेत कागदपत्र पडताळणी होईल. निवड प्रक्रियेत नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील रहिवाशांना प्राधान्य दिले जाईल. या भरतीसाठी शिकाऊ उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षेत पदवीधर उमेदवारांसाठी किमान 60% आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी किमान 55% गुण आवश्यक आहेत.
प्रशिक्षण आणि स्टायपेंड
निवड झालेल्या उमेदवारांना एक वर्षाचा प्रशिक्षण कालावधी असेल. या कालावधीत पदवीधर उमेदवारांना दरमहा 9,000 आणि पदविकाधारक उमेदवारांना 8,000 स्टायपेंड दिला जाईल.
अर्ज करण्याची प्रक्रिया