Thursday, March 6, 2025
Homeक्रीडाचॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामना पावसामुळे रद्द झाला तर विजेता कोण? जाणून घ्या

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामना पावसामुळे रद्द झाला तर विजेता कोण? जाणून घ्या

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाचा 4 गडी राखून पराभव केला. अंतिम फेरीत भारताचा सामना दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील विजेत्या संघाशी होणार आहे. हा सामना 9 मार्चला दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात होणार आहे.

 

पण या स्पर्धेत पावसाचा पडलेला खंड पाहून क्रीडाप्रेमींना चिंता लागून आहे. साखळी फेरीत तीन सामने पावसामुळे रद्द झाले. त्यामुळे अंतिम सामन्यातही असंच काही झालं तर काय? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. सामना रद्द करण्याची वेळ आली तर विजेता कसा घोषित करणार? असे एक ना अनेक प्रश्न विचारले जात आहेत. तसं पाहिलं तर दुबईत पावसाची कोणतीही शक्यता नाही. 9 मार्चला होणारा कोणत्याही व्यत्ययाशिवाय पार पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पण निसर्गाचा लहरीपणा पाहता कधी काय होईल सांगता येत नाही. अशा स्थितीत आयसीसीने प्रयोजन करून ठेवलं आहे. उपांत्य फेरीप्रमाणे अंतिम फेरीसाठी एक दिवस राखून ठेवला आहे.

 

अंतिम फेरीचा सामना पावसामुळे 9 मार्चला झाला नाही तर 10 मार्चला जिथे सामना थांबला तेथून पुढे खेळला जाईल. पण राखीव दिवशीही पावसाने हजेरी लावली तर डकवर्थ लुईस नियमानुसार निकाल दिला जाईल.जर पावसामुळे सामना प्रभावित झाला तर निर्धारित वेळेनंतर षटकांची संख्या कमी केली जाईल. तथापि, जर प्रत्येक संघ किमान 20 षटके खेळू शकला नाही तर डकवर्थ लुईस पद्धतीने दिवस निकालाविना रद्द केला जाईल. तसेच दोन्ही संघांना विजेता घोषित केलं जाईल.

 

2022 आणि 2013 मध्ये भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यावर पावसाचा परिणाम झाला होता. 2002 साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत असाच प्रसंग घडला होता. तेव्हा अंतिम सामना आणि राखीव दिवस पावसामुळे वाया गेला होता. तेव्हा आयसीसीने भारत आणि श्रीलंकेला संयुक्त विजेते घोषित केलं होतं. तर 2013 मध्ये पावसामुळे सामना 20 षटकांचा केला होता. तेव्हा भारताने 20 षटकात 7 गडी गमवून 129 धावा केल्या आणि इंग्लंडला 124 धावांवर रोखलं. हा सामना भारताने 5 धावांनी जिंकला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -