कालच्या रिकव्हरीनंतर आज शेअर बाजारात सकारात्मक ट्रिगर दिसून आला आणि सुरुवातही जोरदार झाली. सेन्सेक्स 475 अंकांच्या वाढीसह 74,204 च्या आसपास व्यवहार करत होता.
जवळपास 150 अंकांनी वाढत निफ्टी 22,476 च्या पातळीवर व्यवहार करत होता. निफ्टी बँकही 255 अंकांच्या वाढीसह 48,744 च्या पातळीवर होता. निफ्टीच्या मिडकॅप 100 निर्देशांकात सुमारे 500 अंकांची वाढ होऊन तो 49,666 च्या पातळीवर होता.