Tuesday, August 26, 2025
Homeमहाराष्ट्रधक्कादायक! आरोपी दत्ता गाडेचा 'तो' फोटो आला समोर; स्वारगेट प्रकरणात नवीन खुलासा

धक्कादायक! आरोपी दत्ता गाडेचा ‘तो’ फोटो आला समोर; स्वारगेट प्रकरणात नवीन खुलासा

पुण्यातील स्वारगेट बसस्थानकामध्ये २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली. या प्रकरणी दत्तात्रय गाडे या आरोपीला पोलिसांनी अटक केली.

 

दरम्यान, आता या नराधमाबाबत नवीन माहिती समोर आली आहे. दत्तात्रय गाडे याचे पोलिसांच्या वेषातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गाडे हा स्वारगेट पोलीस ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात स्वत: पोलीस असल्याचे भासवून तरुणींना फसवायचा अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

दत्तात्रय गाडे याचा पोलिसांच्या वेषातील फोटो समोर आला आहे, यामुळे आता गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. दत्तात्रय गाडे याला गेल्या वर्षी स्वारगेट पोलिसांनी मोबाईल चोरीच्या आरोपाखाली अटक केली होती. त्यावेळी त्याच्या मोबाईलमध्ये पोलिसांच्या वेषातील फोटो आढळला आहे. पोलीस भरतीबाबत आपण मार्गदर्शन करु शकतो, असं सांगत गाडे तरुणींच्या संपर्कात येत होता. गाडे याने पोलिसांचा गणवेश कुठून आणला याबाबत अजूनही माहिती समोर आलेली नाही. त्याच्याविरोधात सहा गुन्ह्यांची नोंद आहे.

 

दत्तात्रय गाडे हा स्वारगेट पोलीस ठाण्याच्या परिसरात फिरायचा. कधी एसटी कंडकस्टर आहे, तरी कधी पोलीस असल्याचे तरुणींना भासवायचा आणि फसवायचा अशी माहिती समोर आली आहे.

 

पुणे, शिरूर, सोलापूर अनेक बस स्थानकात आरोपीचा मुक्त वावर

 

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्याबद्दल तपासातून आणखी एक नवीन माहिती समोर आली आहे. यामुळे आरोपीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांनी आरोपीची दोन वर्षांतली फोनची कुंडली काढली असून, त्यात त्याचा स्वारगेट बस स्थानकच नव्हे, तर शिवाजीनगर, पुणे स्टेशन, शिरूर, अहिल्यानगर आणि सोलापूर बस स्थानक परिसरात मुक्त वावर असल्याचे दिसून आले आहे. इतर बस स्थानकांच्या तुलनेत तो स्वारगेट बस स्थानकातच अधिक काळ वावरला असल्याची माहिती समोर आली आहे.

 

शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशनचा परिसर ही गर्दीची ठिकाणे त्याने हेरली होती. या परिसरात महिला आणि पुरुष प्रवाशांची सतत वर्दळ असते. याच संधीचा फायदा घेऊन गाडे हा गुन्हेगारी कृत्य करत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे पोलिसांनी गाडेची कुंडली काढली असून, त्या अनुषंगाने पोलिस तपास करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -