Thursday, March 13, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी: शिवाजीनगर पोलिस ठाण्यात युवकाने पेटवून घेतले

इचलकरंजी: शिवाजीनगर पोलिस ठाण्यात युवकाने पेटवून घेतले

पत्नी दुसरा विवाह करत असल्याचे समजल्याने कळकंब (अकलुज) येथील पतीने इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाणे आवारात अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. शेखर अर्जुन गायकवाड (वय ३१) असे त्याचे नाव आहे.

या घटनेमुळे पोलीस ठाण्यात एकच खळबळ माजली. त्याचा जीव वाचवण्यासाठी सुरु असलेली धावपळ आणि भयभीत झालेल्या पोलिसांसह नागरिकांचे त्याला वाचवण्यासाठी धडपड सुरु होती. जखमी शेखर याला इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले. तेते प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात पाठविण्यात आले.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सोलापूर जिल्ह्यातील कळकंब (अकलुज) येथील शेखर गायकवाड याची इचलकरंजी सासरवाडी आहे. तो पत्नीला त्रास देत असल्याने त्याची पत्नी सध्या माहेरीच राहत होती. दोघांमध्ये नोटरी पध्दतीने सोडचिठ्ठी झाली आहे. त्यामुळे पत्नीचा नातेवाईकांकडून दुसरा विवाह करून दिला जात असल्याची माहिती शेखरला मिळाली. त्यामुळे तो आज इचलकरंजीत येऊन तिचा दुसरा विवाह करण्यास विरोध करत होता. त्यातूनच त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर शेखरने थेट शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठत पोलिसांसमोर आपली कैफीयत मांडली.

पोलिसांनी धीर धरण्याचा सल्ला दिला. परंतु ऐकण्याच्या मनःस्थितीत नसलेल्या शेखरने अचानक पोलीस ठाणे आवारातच अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. त्यानंतर जीवाच्या आकांताने तो सैरभैर पळू लागला. वाचवा, वाचवा म्हणत त्याने पोलीस ठाण्यातही प्रवेश केला. तसेच पेटलेल्या स्थिती पोलीस गाडीत शिरण्याचाही प्रयत्न केला. त्यावेळी काहींनी स्वतःचे कपडे काढून आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस ठाण्यासमोरील घरातून चादर आणून त्याच्या अंगावर टाकली. त्यामुळे आग आटोक्यात आली. त्याला इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात नेत तेथे प्राथमिक उपचार करण्यात आले. परंतु जास्त प्रमाणात भाजल्याने शेखरला पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. परंतु, पत्नी किंवा सासरवडीतील नातेवाईकांना आणा, त्याशिवाय उपचारच घेणार नाही असा हट्ट सुरु केला होता. पण पोलिसांनी त्याची समजूत काढत सीपीआर रुग्णालयाकडे नेले.

शिवाजीनगर पोलिसांनी रात्री उशिरा दिलेली माहिती अशी कि, ज्या युवकाने पेटवून घेतले आहे तो गुन्हेगार आहे. त्याच्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत. तो ड्रायव्हरचे काम करतो. आतापर्यंत त्याने सर्वांना माझा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे असेच सांगून फसवणूक केली आहे. त्याने परवाच पुण्यातील एका ट्रान्सपोर्ट कंपनीला फसवले आहे. त्याच्या विरोधात गुन्हाही दाखल आहे. तिथून तो लपून छपून इचलकरंजीमध्ये आला. त्याने इचलकरंजी येथील मुलीशी असेच फसवून देवळात लग्न केले आहे.

 

तसेच त्याच मुलीशी ५०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर करार करून आम्ही दोघेही विभक्त राहत आहे, असे लिहूनही दिले आहे. लग्नापूर्वीही त्याने इचलकरंजीच्या नातेवाईकांना ट्रान्सपोर्ट कंपनी आहे म्हणून सांगितले होते. त्याचीही फसवणूक लक्षात आल्यावर ती मुलगी त्याच्यापासून विभक्त राहत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -